संत मुक्ताबाई यांची संपूर्ण माहिती मराठी | Sant Muktabai Information In Marathi

Sant Muktabai Information In Marathi Language | संत मुक्ताबाई यांची संपूर्ण माहिती मराठी – संत मुक्ताबाई किंवा मुक्ताई या वारकरी परंपरेतील वैष्णव संत होत्या. त्यांचा जन्म आपेगाव येथे श्री विठ्ठल पंत कुलकर्णी यांच्या पोटी देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला आणि त्या पहिले वारकरी संतश्रेष्ठ श्री  ज्ञानेश्वरांच्या धाकट्या भगिनी होत्या. संत मुक्ताबाईंनी आपल्या हयातीत एकूण १४० अभंग रचले आणि संत ज्ञानेश्वरांना उद्देशून लिहिलेले “ताटी उघाडा ज्ञानेश्वरा” हे ताटीचे अभंग त्यांच्या अद्वितीय साहित्य रचनांपैकी एक आहेत.

महाराष्ट्रामध्ये अनेक संत महात्मे होऊन गेले त्यांच्या पदस्पर्शाने महाराष्ट्र भूमी ही पावन होऊन गेली आहे या संतांमध्ये विविध स्त्री संतांची सुद्धा ख्याती व महानता मोठी आहे ज्यांनी सुद्धा समाजामध्ये विविध कार्य करून जनतेला समाज प्रबोधनाची दिशा दाखवून बहुमूल्य वाटा उचलला आहे. आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास संत मुक्ताबाई यांच्या बद्दल माहिती देणार आहोत. हा लेख तुम्ही संपूर्ण वाचावा.

Table of Contents

संत मुक्ताबाई यांचे जीवन चरित्र | Sant Muktabai Information In Marathi Language

नाव –संत मुक्ताबाई
जन्मवर्ष –इसवी सन १२७९
जन्मस्थान –पंढरपूर, महाराष्ट्र,
संप्रदाय –वारकरी संप्रदाय
गुरू –संत ज्ञानेश्वर
योगदान –भक्तिपर अभंग, आध्यात्मिक शिक्षण
धर्म –हिंदू धर्म
तत्वज्ञान –वैष्णव
समाधीचे स्थान –मुक्ताइनगर, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र, भारत
कार्य –भक्ति मार्गात प्रभाव, मराठी साहित्यात योगदान

संत मुक्ताई यांची माहिती बालपण

संत मुक्ताबाई या ज्ञानेश्वरांच्या बहिण असून यांचा जन्म १२७९ साली महाराष्ट्र राज्यामधील आपेगाव या ठिकाणी झाला. मुक्ताबाईंना लाडाने मुक्ता या नावाने प्रचिती मिळाली होती. मुक्ताबाईंच्या वडिलांचे नाव विठ्ठल पंत तर आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते. संत मुक्ताबाई यांना संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ संत सोपान देव असे मोठे भाऊ होते. मुक्ताबाई व त्यांची इतर भावंडे ही ज्ञान, विरक्ती, भक्ती, मुक्ती इत्यादी गोष्टींचे स्वरूप घेऊन जन्माला आली होती. साक्षात एक दिव्यमूर्ती असणाऱ्या या संतांचे आई-वडील म्हणजेच रुक्मिणी व विठ्ठल पंत हे थोर व महान होते, ज्यांच्या पोटी संत मुक्ताबाई, ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपान देव यांसारख्या मुलांचा जन्म झाला.

संत मुक्ताबाई यांची कौटुंबिक पार्श्वभूमी

एकनाथ महाराजांच्या आख्यायिकेप्रमाणे मुक्ताबाई गोविंद कुलकर्णी आणि रुक्मिणी कुलकर्णी यांचे चौथे अपत्य होते विठ्ठलपंत यांनी त्या काळात संसाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला होता, त्यानंतर त्यांचे वडील काशीला गेले. परंतु जेव्हा त्यांच्या गुरूंना समजले की विठ्ठल पंत हे विवाहित आहेत. त्यावेळी ते संन्यास घेऊ शकत नाहीत, यासाठी त्यांच्या गुरुने त्यांना परत त्यांच्या घरी पाठवले. गुरु आज्ञेप्रमाणे गृहस्थ्रमे प्रवेश केला यामुळे समाजाने त्यांना वाळीत टाकले यानंतर त्यांच्या संसाराची परवड सुरू झाली.

ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांची मुंज करण्याचे आळंदीच्या ब्राह्मणांनी नाकारले. त्यावर विठ्ठलपंतांनी उपाय काय असे धर्मशास्त्रींना विचारले. त्यावर केवळ देहदंडाचीच शिक्षा आहे असे ब्राह्मणांनी सांगितले. मुले संस्कारांपासून वंचित राहू नये व त्यांचे भविष्यात भले व्हावे यासाठी विठ्ठलपंतानी व रुक्मिणीबाई यांनी आत्महत्या करून देहान्त प्रायश्चित्त घेतले.

घरामध्ये पुन्हा प्रवेश झाल्यानंतर, विठ्ठलपंत यांना चार मुले झाली. त्यांचे नाव होते निवृत्ती, ज्ञानदेव, सोपानदेव, व मुक्ताबाई. थोड्या कालांतराने विठ्ठल पंत यांनी विठ्ठलाची तीर्थयात्रा सुरू केली. व ते पुणे जिल्ह्यातील आळंदी या गावात स्थायिक झाले. तत्कालीन कर्मठ सनातन समाजात संन्याश्याने गृहस्थाश्रम स्वीकारण्यास परवानगी नव्हती, म्हणून विठ्ठलपंत व त्यांच्या पूर्ण कुटुंबाला गावातल्यांनी वाळीत टाकले.

पुढे ही भावंडे पैठणला गेली आणि तेथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या सुंदर भाषेत शब्दरचना केली आहे. भिक्षा मागून ते आपला उदार निर्वाह करू लागले आणि हळूहळू या भिक्षा मागणाऱ्या मुलांची कुशाग्र बुद्धी व शास्त्र ज्ञान पाहून पैठणमधील ब्राह्मण दुःखी होत असत. शेवटी 1288 साली पैठण मधील ब्राह्मणांनी चारही भाऊ बहिणींना शुद्ध करून पुनः समाजात सम्मिलित केले.

या मुलांना जगाला समर्पित करून रुक्मिणीबाई व विठ्ठलपंतांनी जगाचा निरोप घेतला. लहानपणातच संत मुक्ताबाई व त्यांच्या भावंडांना संन्याशाची पोर असे मानून त्या काळातील ब्राह्मण समाजाने वाळीत टाकले. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर भावंडांना आईचे प्रेम देण्यासाठी व गृहलक्ष्मी म्हणून वावरण्याची जबाबदारी ही मुक्ताबाई यांच्या वरतीच आली व ही जबाबदारी मुक्ताबाईंनी अगदी हसत हसत स्वीकारून आपल्या भावंडांना आईप्रमाणे माया दिली. खेळण्या बागडण्याच्या वयामध्ये मुक्ताबाईंनी प्रौढ, गंभीर तसेच सहनशील रूपाची जगास ओळख करून दिली.

Sant Muktabai Information In Marathi

संत मुक्ताबाई यांची गुरुपरंपरा

मच्छिंद्रनाथ ऊर्फ मत्स्येंद्रनाथ – गोरखनाथ ऊर्फ गोरक्षनाथ – गहिनीनाथ – निवृत्तीनाथ – मुक्ताबाई अशी ही गुरुपरंपरा आहे.

मुक्ताबाईच्या जीवनातील ठळक घटना

मुंगी उडाली आकाशी | तिने गिळिले सुर्यासी||
थोर नवलाव झाला | वांझे पुत्र प्रसवला ||

असे म्हणणाऱ्या संत मुक्ताबाई या संत ज्ञानेश्वर यांच्या बहिण या भक्तीयोग मार्गामध्ये पारंगत अशाच असामान्य बुद्धिमत्ता असलेल्या महान संत होत्या.

मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर मांडे बनविले

एकदा मुक्ताबाईंना ज्ञानेश्वर महाराजांनी मांडे बनवण्यासाठी सांगितले मांडे बनवण्यासाठी लागणारे मातीचे खापर बाजारातून खरेदी करण्यासाठी मुक्ताबाई या कुंभारवाडा मध्ये गेल्या. त्याकाळी विसोबा हे त्या गावाचा प्रमुख व्यक्ती होते. ते नेहमी मुक्ताबाई, ज्ञानेश्वर, सोपानदेव, निवृत्तीनाथ यांचा द्वेष करत. त्याने मुक्ताबाईला कोणीही खापर देऊ नये अशी गावामध्ये ताकीद दिली होती त्यामुळे गाववाल्यांनी मुक्ताबाईंना खापर देण्यास मनाई केली.

हिरमुसला चेहरा घेऊन मुक्ताबाई रिकाम्या हाताने घरी आल्या. मुक्ताबाईंचा हिरमुसलेला चेहरा बघून संत ज्ञानेश्वरांनी आपल्या योगशक्ती द्वारे स्वतःची पाठ गरम करून पाठीवरती मांडे भाजण्यास सांगितले. हा चमत्कार विसोबाने पाहून ते ज्ञानेश्वरांच्या शरण आले. मुक्ताबाई या इतक्या करुणामय व दयाळू होत्या की त्यांच्यावर गोरक्षनाथांच्या कृपेचाही वर्षाव होता त्यामुळे त्यांना अमृत संजीवनी प्राप्त झाली होते असे मानले जाते.

ज्ञानेश्वरांनी मुक्ताबाईस दिलेली सनद

थोरले बंधू निवृत्तीनाथ यांनी ज्ञानेश्वर, मुक्ताबाई आणि सोपानदेव यांना नाथ संप्रदायाची दीक्षा दिली. त्यामुळे ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाई यांच्यामध्ये गुरू बंधुभगिनी असे एक अलौकिक नाते निर्माण झाले. मुक्ताबाईना आलेल्या साधनेतील शंका आणि प्रश्न त्यांनी ज्ञानेश्वरांना विचाराव्यात आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाच्या आधारे भक्तिमार्गात पुढे वाटचाल करावी असे चालू असे. एके दिवशी ज्ञानेश्वर मुक्ताबाईस म्हणाले, आठवे समाधीचे अंग आले तुज, आता नाही काज आणिकांसी. ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाई यांच्यातील हा संवाद ज्ञानेश्वरांनी ‘मुक्ताबाईस दिलेली सनद’ या नावाने प्रसिद्ध आहे.

ताटीचे अभंग आणि ज्ञानेश्वरीची निर्मितीताटी उघडा ज्ञानेश्वरा

ताटीच्या अभंगात तिच्या या स्पष्टवक्तेपणाने थोडे निराळे वळण घेतले आहे. एक दिवस ज्ञानदेवांना पाहून कोणा टवाळाने त्यांना संन्याशाचा पोर म्हणून हिणवले तेव्हा ज्ञानदेव मनात खिन्न होऊन झोपडीत जाऊन बसले व काही केल्या ताटीचे दार उघडीनात. त्या वेळी मुक्ताईने त्यांच्या ज्या विनवण्या केल्या त्या ‘ताटीचे अभंग’ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांत जसा वडील भावावर रुसलेल्या धाकट्या बहिणीचा लडिवाळपणा आहे, तसाच परिणत प्रौढत्वाला साजेल असा समंजसपणाही आहे. मुंगी उडाली आकाशी । तिने गिळिले सूर्यासी ।  असे तिचे एक वचन आहे. हे तिला स्वतःलाही लागू पडते.

त्यातून पुढे संत ज्ञानदेव यांच्याकरवी ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली.

योगीराज चांगदेव मुक्ताबाई भेट

चांगदेव हे योगमार्गातील अधिकारी पुरुष होते. योगसामर्थ्याने ते चौदाशे वर्षे जगले अशी मान्यता आहे.. यांच्या गुरूचे नाव वटेश्वर म्हणून यांना चांगावटेश्वर असेही म्हणतात. काहींच्या मते वटेश्वर म्हणजे चांगदेवांच्या अंतरंगात प्रकाशणारे ईश्वराचे रूप. तापी – पूर्णा नदीच्या तीरावर चांगदेव या गावाजवळच्या वनात डोळे बंद करून तपश्चर्या करीतच हे योगी झाले होते. त्यांच्या चांगल्या रूपावरून लोक त्यांना चांगदेव म्हणू लागले. त्यांनी आपल्या योगसामर्थ्यावर वाघ, सर्प अशा हिंस्त्र श्वापदांना वशीभूत केलेले होते.

त्यांनी ज्ञानेश्वरांना कोरे पत्र पाठविले होते. योगी असूनही चांगदेवांमध्ये आत्मज्ञानाची आणि गुरुकृपेची कमतरता आहे असे निवृत्तीनाथांच्या लक्षात आले. त्यांनी ज्ञानेश्वरांना चांगदेवांनी पाठविलेल्या पत्रास उत्तर देण्यास सांगितले. त्यावेळेस ते कोर पत्र पाहुन मुक्ताबाई म्हणाल्या १४०० वर्षें तप करून पण चांग्या कोराच राहिला !

ज्ञानेश्वरांनी त्या पत्राला जे उत्तर लिहिले ते चांगदेव पासष्टी या नावाने प्रसिद्ध झाले. त्यानंतर चांगदेव यांची निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई व सोपान यांची भेट झाली. पुढे चांगदेवांनी मुक्ताबाईना गुरू मानले. सन १३०५ (शके १२२७)मध्ये चांगदेवांनी समाधी घेतली.

संत नामदेवांची भेट

एका प्रसंगी सर्व संत एकादशीसाठी पंढरपुरात एकत्र जमले असता तेथे वयाने ज्येष्ठ व ज्यांना सारे आदराने ‘काका’ म्हणत, अशा गोरा कुंभारांना मुक्ताई सर्व संतांची परीक्षा घेण्याचे सुचविते. गोरोबा हातात थापटणे घेऊन प्रत्येक संतांच्या डोक्यावर थापटतात. कोणीही काही बोलत नाही. मात्र, नामदेवांच्या डोक्यावर थापटणे मारल्यावर ते चिडतात. तेव्हा ‘हे मडके कच्चे आहे’ असा निर्वाळा गोरोबा देतात. मुक्ताई नामदेवांना ‘गुरुशिवाय ज्ञान वा भक्ती व्यर्थ आहे,’ असा उपदेश करून त्यांना गुरूचा उपदेश घेण्याचा सल्ला देतात. त्यामुळे नामदेवांनी मुक्ताईचे शिष्य ‘विसोबा खेचर’ यांना गुरु केले.

वय, अधिकार आणि भक्तीने श्रेष्ठ असूनही नामदेवांना त्यांचे न्यूनत्व स्पष्टपणे सांगण्याचे धाडस मुक्ताईने केले आणि त्यांच्या श्रेष्ठत्वाचा मार्ग खुला झाला. भक्तिपंथातही आत्मसाक्षात्कारासाठी व मोक्षप्राप्तीसाठी गुरुची भेट व अनुग्रह आवश्यक आहे, हेच खरे! पुढे स्वतः नामदेवांनी चोखामेळ्याच्या शिरावर वरदहस्त ठेवला व त्यांना नाममंत्राची दीक्षा दिली आणि हृदयस्थ परमात्म्याचा चोखोबांना साक्षात्कार झाला.

गोरक्षनाथ कृपेचा अनुभव आणि मिळालेले वरदान

नामदेवांच्या परीक्षेच्या निमित्ताने मुक्ताबाई यांच्या योगसामर्थ्याची प्रचिती भावंडांना आली आणि मुक्ताबाई ‘माय’ या स्वरुपात वंदनीय झाली. या प्रसंगामध्ये मुक्ताबाई यांना गोरक्षनाथ यांच्या कृपेचा अनुभव आला. अमृत संजीवनी लाभण्याचा हा अनुभव होता. याच प्रसंगी त्यांना ‘चिरकाल अभंग शरीरा’चे वरदान मिळाले होते. पूर्वजन्मातील मुक्ताबाईला गोरखनाथांचा उपदेश असून ती चक्रधरांना त्यांच्या एकाकी भ्रमंतीत सालबडीच्या डोंगरात (ढेरे यांच्या मते श्री शैल पर्वतावर) एका वृद्ध योगिनीच्या रूपात भेटली होती (लीळा-चरित्र, एकाक ९).

मुक्ताबाईंचा अज्ञातवास

श्रीज्ञानेश्वर भावंडे आणि संत नामदेव हे तीर्थाटनास गेलेले आहेत, त्याचे सविस्तर वर्णन नामदेव गाथेमध्ये आले आहे. परंतु या तीर्थयात्रेस मुक्ताबाई गेल्या नाहीत. शिष्य योगीराज चांगदेव यांच्यासमवेत त्या आळंदीजवळ असलेल्या सोळू या गावी अज्ञातवासात राहिल्या.

संत मुक्ताबाई समाधी ठिकाण- Sant Muktabai Samadhi

संत ज्ञानेश्वर महाराजांनी जगाचा निरोप घेण्याचे ठरवले पण समाधी घेतल्यानंतर, संत ज्ञानेश्वर यांचे ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ व बहिण मुक्ताबाई हे तीर्थयात्रा करण्यासाठी निघून गेले. 12 मे १२९७ रोजी तीर्थयात्रा करत असताना तापी नदीवर थांबले त्यावेळी आकाशातून झालेल्या प्रचंड वीज कडाक्यामध्ये मुक्ताबाई या विजेच्या प्रवाहात लुप्त झाल्या.
संत मुक्ताबाई यांची समाधी जळगाव जिल्ह्यामधील कोथळी या ठिकाणी आहे.

संत मुक्ताबाई यांची संपूर्ण माहिती – व्हिडिओ

संत मुक्ताई अध्यात्म – जीवन – कार्य – कर्तृत्व

महाराष्ट्रातील भक्ती चळवळीला आकार देण्यात मुक्ताबाईंच्या साहित्यिक योगदानाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तिचे अभंग भक्ती साहित्याचे रत्न मानले जातात आणि आजही भक्तांनी ते गायले आणि जपले जातात. मुक्ताबाईंच्या रचनांमध्ये खोल उत्कंठा आणि शरणागतीपासून ते परमात्म्याशी आनंदी मिलनाच्या क्षणांपर्यंत अनेक प्रकारच्या भावनांचा समावेश आहे. तिचे अभंग त्यांच्या गेय सौंदर्य, साधेपणा आणि प्रगल्भ आध्यात्मिक अंतर्दृष्टीने वैशिष्ट्यीकृत आहेत.

संत मुक्ताबाई साहित्य

मुक्ताबाईंनी बालपणीच त्यांच्या समकालीन समाजाचे उग्र कठोर वास्तव अनुभवले आणि ते पचवून लौकिक जीवनसंघर्षाकडे पाठही फिरविली. त्यांच्या वाणीत सांसारिक सुखदुःखाचा वा क्लेश पीडांचा प्रतिसाद नाही. सारे जीवनच त्यांनी अलौकिक रंगात रमवून टाकले आहे. मुक्ताबाईंनी ज्ञानदेवांच्या संत मंडळीतील श्रेष्ठांनादेखील आपल्या आध्यात्मिक अधिकार बळावर स्पष्टोक्तीच्या सुरात जागविले आहे.  मुक्ताबाईंनी रचलेल्या अभंगाची संख्या जरी मोजकीच असली तरी त्यांच्या अभंगवाणीतूनही त्यांच्या प्रद्नेची, विचाराची भव्यता आणि उत्तुंग कल्पनेची दिव्यता अनुभवायला मिळते.

त्यांच्या अभंगाच्या ओळी ओळीतून, शब्दाशब्दातून त्यांचा परिपूर्ण अध्यात्माधिकार, योगसामर्थ्य, प्रौढ प्रगल्भ जाण, अविचल आत्मविश्वास यांचे सुशांत दर्शन घडत राहते. मुक्ताबाईंनी ताटीचे अकरा अभंग लिहिले आहेत. तसेच हरिपाठाचे अभंगही लिहिले आहेत. हरिपाठ म्हणजे मुक्ताबाईचे अनुभवकणच आहेत. आत्मरुपाचा साक्षात्कार शब्दात व्यक्त करण्याचा हा त्यांचा एक अविष्कार आहे.

संत मुक्ताबाई अभंग गाथा – Sant Muktabai Abhang

गाथेत मुक्ताईच्या नावावर एकूण ४२ अभंग आहेत. त्यात तिने आपला शिष्य चांगदेव याला उद्देशून रचिलेल्या व आता त्याच्या नावावर छापलेल्या सहा अभंगांची भर घालावी लागेल. त्या सहा अभंगात मुद्रिका ‘मुक्ताई म्हणे’ अशीच आहे. याशिवाय नामदेव गाथेतील ‘नामदेव-भक्तिगर्वपरिहार’ या मथळ्याखालील अभंगांपैकी (१३३४ ते १३६४) दहापंधरा तरी निश्चितपणे मुक्ताईचे आहेत. तसेच गाथेत न मिळणारे ‘ताटीचे अभंग’ ही तिचेच होत. म्हणजे तिची एकूण अभंगरचना सु. पाऊणशेच्या घरात जाईल. ती सर्व रचना काव्यगुणांनी समृद्ध आहे. ती मुख्यतः भक्तिपर असले, तरी योगमार्गाच्या खुणांनीही ती युक्त आहे.

ताटीचे अभंग

मुक्तेने आपल्यापेक्षा मोठ्या भावंडांना मायेची पाखर दिली. वात्सल्याने सावरले व प्रसंगी जागरूक करण्यासाठी आत्मीयतेने फटकारले देखील. म्हणुनच तर पाठची बहीण असूनही जगावर रुसुन बसलेल्या आपल्या ज्ञानदादाला तिने अधिकारवाणीने समजावले. संत कोणाला म्हणावे, संताची वागणूक कशी असावी हे ज्ञानदादाचा मनावर बिंबवले. ही समजूत घालत असताना मुक्तेने उस्फुर्तपणे जे अभंग गायले तेच पुढे ताटीचे अभंग म्हणून प्रसिद्ध झाले. ताटीच्या अभंगात मुक्तेचे हळुवार, समंजस, प्रसंगावधानी, उच्च पातळीवरचे व्यक्तिमत्व साकार झाले आहे. त्यात मुक्तेने जी संतत्वाची लक्षणे सांगितली आहेत ती मूर्तिमंत तिच्या व्यक्तित्वात दिसून येतात

ज्ञानबोध ग्रंथ

मुक्ताबाईंनी ‘निवृत्ती-मुक्ताई संवादरूप ज्ञानबोध’ या ग्रंथाचे लेखन केले आहे असे संशोधनान्ती स्पष्ट होते. ह्या ग्रंथामध्ये संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई ह्यांचा संवाद आलेला आहे. या ग्रंथाच्या सुरुवातीला निवृत्तीनाथांनी मुक्ताबाईंना १२४ अभंगांमध्ये प्रश्न विचारले आहेत आणि त्या प्रश्नांना मुक्ताबाईंनी ५४ अभंगांमध्ये उत्तरे दिली आहेत. मुक्ताबाई समाधिस्थ होण्याच्या थोडेसे आधी झालेले हे लिखाण असावे, असे त्यातील अंतर्गत संदर्भांवरून लक्षात येते.

संत मुक्ताबाई आणि इतर संत यातील अनुबंध

मुक्ताईच्या काव्यात तिच्या जीवनाचे व प्रतिभेचे अनेक पैलू उठून दिसतात. अंधपणामुळे वाया जात असलेल्या या मुक्ताईला निवृत्तिराजाने सावध केले व त्यामुळे ‘मुक्तपणे मुक्त । मुक्ताई पैं रत । हरिनाम स्मरत । सर्वकाळ ।’ अशी आपली अवस्था होऊन गेल्याचे ती सांगते. तिच्या अभंगात योगाच्या खुणा आहेत, अध्यात्माची उंची आहे, साक्षात्काराचे पडसाद आहेत, हे सर्व खरे; पण त्याबरोबरच त्यांत हृदयाचे मार्दव आणि भावनेची हळुवारताही आहे.

मुक्ताबाई – चांगदेव संवाद

 ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती ऐकून चांगदेव भेटायला येतात. भेटीनंतर ते ज्ञानेश्वर महाराज यांना आपल्याला शिष्य करून घ्यावे, अशी विनंती करतात. पण ज्ञानेश्वर महाराज त्यांना तुम्हाला योग्य वेळी गुरुप्राप्ती होईल, असे सांगतात. मग चांगदेव या चारी भावंडांसोबत आळंदी येथे राहतात. एके दिवशी पहाटे मुक्ताबाई इंद्रायणी नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या असतात. नेमके त्याच वेळेस चांगदेव अंघोळीसाठी ‘इंद्रायणी’वर येतात. छोट्या मुक्ताबाईला अंघोळ करताना पाहून चांगदेव मागे फिरतात. तेव्हा मुक्ताबाई विचारतात, ‘चांगदेव, का परत फिरलात?’ तेव्हा चांगदेव सांगतात, ‘एक स्त्री आंघोळ करीत असताना तिथे मी कसा थांबू?’

तेव्हा मुक्ताबाई म्हणतात, ‘अरे चांग्या, एवढा वयस्कर झालास तरी अजून तुझ्यातला स्त्री-पुरुष हा भेद गेला नाही.’ मग मुक्ताबाई त्याला उपदेश करतात. चांगदेव गुरू म्हणून मुक्ताबाईच्या चरणी लीन होतात. आतापर्यंत योगी म्हणून आपण खूप नाव मिळविले; पण त्याचा काही उपयोग नाही. खर्‍या ज्ञानाची प्राप्ती तर आता झाली. म्हणजे हा माझा नवा जन्म आहे.

चांगदेव म्हणे आज जन्मा आलो । गुरुपुत्र झालो मुक्ताईचा ॥

संत नामदेव आणि संत मुक्ताबाई

मुक्ताईच्या चरित्रातील दुसरी विशेष गोष्ट म्हणजे तिने ज्ञानदेवांच्या भेटीस आलेल्या अहंमन्य नामदेवांचे उघडे केलेले अज्ञान. तिचे त्या प्रसंगी जाणवलेले प्रभावी व्यक्तिमत्त्व पाहूनच नामदेवांनी तिच्याविषयी ‘लहानशी मुक्ताबाई जैसी सणकांडी । केले देशोधडी महान संत’ असे उद्‌गार काढले. पुढे नामदेव-चांगदेव ह्या दोघांनी तिचा गौरव केला आहे हे खरे; पण तिच्या स्वतःच्या भावंडांनी तिच्या संबंधात कोठे अवाक्षरही काढलेले नाही. असे का व्हावे? ती निवृत्ति-ज्ञानदेवांच्या जीवनाशी इतकी एकरूप झाली होती.

विसोबा खेचर आणि संत मुक्ताबाई

संत विसोबा हे महाराष्ट्रातील मोठे संत होऊन गेले. संत ज्ञानेश्‍वर हे त्यांचे गुरु, तर संत नामदेवांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. संत विसोबा खेचर हे शैव पंथीय होते; परंतु त्यांचा वारकरी आणि नाथ संप्रदाय यांच्याशीही जवळचा संपर्क आला. विसोबा खेचर हे खरेतर संत ज्ञानेश्‍वर आणि त्यांच्या भावंडांचा द्वेष करत असत; परंतु एकदा संत ज्ञानेश्‍वर यांच्या पाठीवर संत मुक्ताबाई यांनी मांडे भाजले. त्या वेळी तेथे उपस्थित असलेले संत विसोबा संत ज्ञानेश्‍वरांना शरण गेले.

पंढरपूर तालुक्यात असलेल्या कोर्टी येथील श्री सप्तकोटेश्‍वर मंदिरातील शिवपिंडी ! येथेच संत विसोबा आणि नामदेव महाराज यांची भेट झाली.

योगीराज चांगदेव आणि संत मुक्ताबाई

मुक्ताबाई या थोर व महान संत होत्या त्यांनी जगाच्या कल्याणासाठी विविध कार्य केली. चांगदेव हे एक मोठे तपस्वी व महान संत होऊन गेले त्यांना कोणताही गुरु नव्हता त्यामुळे त्यांना ईश्वर दर्शन झाले नाही मुक्ताबाई यांनी महान तपस्वी चांगदेव यांना 65 चा अर्थ समजावून सांगितला मुक्ताबाईंच्या या अनुग्रहामुळे चांगदेवांना आत्मरूपाची प्राप्ती होऊन ते चौदाशे वर्ष जगले. अवघ्या आठ वर्षाच्या मुक्ताबाईंनी चौदाशे वर्षाच्या चांगदेवांची आध्यात्मिक रित्या गुरु बनली त्यामुळे चांगदेव हे भारावून येऊन त्यांच्या मुखातून असे निघाले की मुक्ताई करे लेईले अंजन.

संत मुक्ताबाई मंदिर – Sant Muktabai Temple

Sant-Muktabai-Temple

लोकसाहित्यातील मुक्ताई

संत मुक्ताबाईंचे ताटीचे अभंग

संत मुक्ताबाई यांनी 42 ताटीचे अभंग रचले आहेत व ते अभंग अतिशय प्रसिद्ध आहेत. या अभंगांच्या द्वारे मुक्ताबाई यांनी आत्मक्लेषामुळे दरवाजा बंद करून बसलेला स्वतःचा भाऊ ज्ञानदेव यांनी दरवाजाची ताटी उघडावी याची विनंती केली आहे. या अभंगाद्वारे मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांना आदिनाथापासून गहिनाथाकडे व गहीनाथाकडून निवृत्ती यांच्याकडे नातं संप्रदायाची आठवण करून दिली. तसेच त्यांनी घराण्याच्या मोठेपणाची व योगी पानाचे स्मरण देखील त्यांच्या ताटीच्या अभंगाद्वारे करून दिले.

मुक्ताबाई यांनी ताटीचे अभंगाद्वारे जनाला असा उद्देश दिला की अवघे विश्व जरीस आपल्यावर रागावले असेल तरी पाण्यासारखे थंड राहून त्या क्रोधाग्नीला भिजवायचे असते. लोकांच्या शब्दामुळे जरी स्वतःला त्रास होत असेल तरी तो एक चांगला उपदेश म्हणून मान्य करून घ्यायचा. अशा गोड व मधुर शब्दांमध्ये मुक्ताबाईंनी जगाला उद्देश दिला आहे.

योगी पावन मनाचा | साहे अपराध जनांचा
विश्वरागे झाले वनी | संती सुके व्हावे पाणी
शब्द शस्त्रे झाले क्लेश | संती मानवा उपदेश
विश्वपट ब्रह्म दोरा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा

असा उपदेश जनतेला देतेवेळी मुक्ताबाई बोलतात आपल्या हातात आपल्याला जरी लागलं तरी त्या त्रासाचा दुःख करून घेऊ नये म्हणजेच ज्यावेळी आपली जीभ ही आपल्या दाताखाली येते व त्याचा आपल्याला त्रास होतो म्हणून आपण दात काढून टाकत नाही त्याचप्रमाणे तुम्हाला जर ब्रह्म पदाला पोहोचायचे असेल यासाठी तुम्हाला लोखंडाचे चणे खाणे आवश्यक आहे व तुम्हाला या पदावर पोहोचण्यासाठी हा अपेक्षा सहन या कराव्याच लागतात.

Sant-Muktabai-Temple

मुक्ताईंनी कितीही प्रयत्न करू नये ज्ञानेश्वर दाराची ताटी उघडत नसल्यामुळे मुक्ताई अगदी भारावून जाऊन हळवी होऊन म्हणते ,

लडीवाळ मुक्ताबाई | जीव मुद्दल ठाईचे ठाई
तुम्ही तरुण विश्वतारा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा

ज्ञानेश्वरांनी ज्यावेळी ताटीचे दार उघडले व त्यानंतर ज्ञानेश्वरांच्या हातून विविध अलौकिक व असाधारण अशी कार्य घडले ज्ञानेश्वराने केलेल्या असाधारण कार्यांना श्री निवृत्तीनाथांची कृपा व मुक्ताबाईंच्या ध्येय स्वप्नांची जाणीव होते मुक्ताबाई या त्यांच्या ताटींच्या अभंग रचनेमधून अत्यंत अर्थपूर्ण अभंग रचना करत मुक्ताबाईंनी ज्याप्रमाणे ताटीच्या अभंगांची रचना केली त्याप्रमाणेच हरिपाठाचे सुद्धा अभंग लिहिले ते खालील प्रमाणे

अखंड जायला देवाचा शेजार
कारे अहंकार नाही गेला |
मानो अपमान वाढवीस हेवा
दिवस असता दिवा हाती घेसी ||

संत मुक्ताबाई यांचे विचार हे साधे परंतु अर्थपूर्ण असत त्यामुळे संत मुक्ताबाईंना त्यांच्या अभंग रचनेमुळे मराठीमधील पहिल्या कवयित्री म्हणून संबोधले जाते. संत मुक्ताबाई यांनी ज्ञानेश्वरांवर आधारित ज्ञानबोध नावाच्या ग्रंथाचे लेखन सुद्धा केले आहे या ग्रंथाच्या द्वारे संत मुक्ताबाई व संत निवृत्तीनाथ यांच्या संवादांचा सुद्धा उल्लेख आलेला आहे.

प्रश्नोत्तरे

संत मुक्ताबाई यांचा मृत्यू कधी झाला?

संत ज्ञानेश्वर महाराजांनी जगाचा निरोप घेण्याचे ठरवले पण समाधी घेतल्यानंतर, संत ज्ञानेश्वर यांचे ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ व बहिण मुक्ताबाई हे तीर्थयात्रा करण्यासाठी निघून गेले. 12 मे १२९७ रोजी तीर्थयात्रा करत असताना तापी नदीवर थांबले त्यावेळी आकाशातून झालेल्या प्रचंड वीज कडाक्यामध्ये मुक्ताबाई या विजेच्या प्रवाहात लुप्त झाल्या.

संत मुक्ताबाई ची समाधी कुठे आहे?

श्री संत मुक्ताबाई समाधिस्थळ श्री क्षेत्र कोथळी (मुक्ताईनगर) येथे संत मुक्ताबाई अंतर्धान सोहळा होत असतो.

निष्कर्ष

मित्रहो आजच्या संत मुक्ताबाई या लेखाद्वारे आम्ही आपणास संत मुक्ताबाई यांच्या बद्दल माहिती दिलेली आहे हा लेख, संत मुक्ताई यांची माहिती आपणास कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परिवारांसोबत सुद्धा शेअर करायला विसरू नका.

धन्यवाद.

Leave a comment