विश्वनाथन आनंद हे एक प्रतिभाशाली बुद्धिबळ खेळाडू आहेत. बुद्धिबळ खेळामध्ये अतिशय प्रसिद्ध नावाजलेले नाव व बुद्धिबळाचा राजा म्हणून विश्वनाथन आनंद यांच्याकडे पाहिले जाते.
त्यांच्या या अविश्वसनीय खेळासाठी भारत सरकारने विश्वनाथन यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. याशिवाय त्यांना पाच वेळा वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप देखील मिळाली आहे.
आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास विश्वनाथन आनंद यांच्या बद्दल माहिती दिलेली आहे. ही माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
विश्वनाथन आनंद मराठी माहिती Viswanathan Anand Information In Marathi
पूर्ण नाव | विश्वनाथन आनंद |
जन्म तारीख | दि. ११ डिसेंबर, १९६९ |
जन्म स्थळ | मयिलाडुथराई, तमिलनाडु |
ओळख | बुद्धिबळाचा राजा |
शिक्षण | पदवीधर |
आईचे नाव | सुशीला |
वडिलांचे नाव | विश्वनाथन अय्यर |
पत्नीचे नाव | अरुणा आनंद |
अपत्य | अखिल |
पुरस्कार | पद्मविभूषण, राजीव गांधी खेलरत्न, पद्मश्री पुरस्कार |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
धर्म | हिंदू |
कोण आहेत विश्वनाथन आनंद ?
विश्वनाथन हे बुद्धिबळाच्या विश्वातील एक नावाजलेले व्यक्तिमत्व असून, बुद्धिबळ जगाचा राजा म्हणून त्यांना संबोधले जाते. सप्टेंबर २०१७ मध्ये आनंद यांनी बुद्धिबळाचा विश्वविजेता बनण्याचा किताब जिंकला व तब्बल सात वर्षानंतर त्यांनी हा पराक्रम केला.
हे वाचा –
- सचिन तेंडुलकर माहिती मराठी
- मेजर ध्यानचंद माहिती मराठी
- कपिल देव माहिती मराठी
- विराट कोहली माहिती मराठी
- पी टी उषा यांची माहिती
- सानिया मिर्झा माहिती
विश्वनाथन हे प्रमुख भारतीय बुद्धिबळपटू आहे. ज्यांनी जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप मध्ये पाच वेळा स्वतःचे स्थान निर्माण केले. नॉक आउट, स्पर्धा, सामना, या तीन प्रकारांमध्ये जागतिक चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावणारे, विश्वनाथन आनंद हे प्रमुख भारतीय आहे.
दि. ११ डिसेंबर १९६९ मध्ये तामिळनाडू या ठिकाणी झालेल्या कृष्णमूर्ती विश्वनाथन अय्यर आणि श्रीमती सुशीला अय्यर यांच्या घरी जन्मलेल्या विश्वनाथन यांनी त्यांच्या त्यांच्या आईच्या अर्थ सुशीला अय्यर यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्धिबळ क्षेत्रामध्ये वाटचाल करण्यास सुरुवात केली.
विश्वनाथन यांनी आपल्या आईला आपले प्रेरणास्थान मानले. डॉन बॉस्को मॅट्रिक्युलेशन, उच्च माध्यमिक शाळेमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर विश्वनाथन आनंद यांनी चेन्नईच्या नोएला कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले.
वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी विश्वनाथन यांनी राष्ट्रीय सब ज्युनिअर चॅम्पियनशिप ची पदवी स्वतःच्या नावे केली. यानंतर आंतरराष्ट्रीय मास्टर ही पदवी मिळवणारे, विश्वनाथन आनंद हे तरुण भारतीय म्हणून नावाजले गेले.
१९८८ मध्ये वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी भारताचा सर्वात तरुण ग्रँडमास्टर म्हणून आनंद यांची ओळख बनली. त्यांच्या या पराक्रमामुळे त्यांना बुद्धिबळाच्या इतिहासामध्ये एक अग्रगण्य स्थान प्राप्त झाले.
हंगेरीच्या पीटर लेकोसोबतच १४ वा व शेवटचा सामना हा अविश्वासनीय व अविस्मरणीय होता. आनंद यांनी पांढऱ्या मोहऱ्यांचा खेळ करत व सोपा ड्रॉ खेळत, अवघ्या वीस चालीमध्येच बुद्धिबळ खेळात यश प्राप्त केले. या खेळामध्ये त्यांना एकूण नऊ गुण प्राप्त झाले. या स्पर्धेमधील आनंद हे एकमेव नॉट आऊट खेळाडू होते.
विश्वनाथन आनंद यांचा जन्म व सुरुवातीचे जीवन
आनंद यांचा जन्म दिनांक ११ डिसेंबर १९६९ मध्ये तमिळनाडू मधील एका छोट्याशा शहरांमध्ये एका ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला.
त्यांचे संगोपन चेन्नई मध्ये झाले. त्यांचे पिता विश्वनाथ अय्यर हे रिटायर्ड रेल्वे अधिकारी होते, तर आई सुशीला देवी या बुद्धिबळच्या प्रशिक्षक होत्या व एक प्रभावशाली समाजसेवक सुद्धा होत्या.
विश्वनाथन यांना त्यांच्या आईमुळे बुद्धिबळ क्षेत्रामध्ये जास्त आकर्षण निर्माण झाले. त्यांनी त्यांच्या आईकडूनच बुद्धिबळ क्षेत्रातील योग्य प्रशिक्षण घेऊन, बुद्धिबळात स्वतःचे नाव कमावले.
सुशीला देवी यांनी आनंद यांना अवघ्या सहा वर्षापासून बुद्धिबळाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली होती. विश्वनाथन यांना एक मोठा भाऊ व एक बहिण देखील आहे, ज्यांचे नाव शिवकुमार व अनुराधा असे आहे.
विश्वनाथन यांनी त्यांचे शालेय शिक्षण डॉ. बॉस्को मॅट्रिक्युलेशन हायर सेकंडरी स्कूल या ठिकाणी पूर्ण केले व त्यांनी वाणिज्य विषयांमध्ये पदवी प्राप्त केली, उच्च शिक्षणासाठी त्यांनी चेन्नई या ठिकाणील लोयोला मध्ये दाखला घेतला.
विश्वनाथन आनंद यांचे वैयक्तिक जीवन
जागतिक बुद्धिबळ क्षेत्रातील चॅम्पियन खेळाडू विश्वनाथन आनंद यांनी अरुणा आनंद यांच्यासोबत विवाह केला. विश्वनाथन व अरुणा आनंद यांना अखिल नावाचा मुलगा आहे. आनंद यांचे शांत हावभाव व एकाग्र मनाच्या वृत्तीमुळे ते इतरांपेक्षा वेगळे दिसतात.
आंतरराष्ट्रीय स्तरावर, बुद्धिबळावर वर्चस्व गाजवण्यास आतुर असणाऱ्या बुद्धिबळ पटूंसाठी आनंद हे एक प्रेरणास्थान आहे. त्यांचे राहणीमान अत्यंत शांत व सोज्वळ व्यक्तिमत्त्वामुळे, विश्वनाथन यांचे नाव इतिहासामध्ये नाही तर, संपूर्ण भारतीयांच्या मनामध्ये अगदी प्रेमाने व आदराने नोंदवले गेले आहे.
विश्वनाथन आनंद यांचे बुद्धिबळ क्षेत्रातील करियर
- विश्वनाथन यांनी २००० ते २००२ पर्यंत फिडे विश्व बुद्धिबळ चॅम्पियनशिप हा किताब स्वतःच्या नावे करून, बुद्धिबळ क्षेत्रात स्वतःची प्रतिभा निर्माण केली.
- २००७ मध्ये विश्वनाथन यांनी वर्ल्ड बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकून, संपूर्ण जगामध्ये स्वतःचे नाव लौकिक केले. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही व बुद्धीचा खेळ म्हणून समजल्या जाणाऱ्या बुद्धिबळा मध्ये आनंद हे बुद्धिबळाचे राजे बनले.
- विश्वनाथ आनंद यांनी २००८ मध्ये त्यांनी नियोजित केलेल्या, वर्ल्ड बुद्धिबळ चॅम्पियनशिप ब्लॉक मध्ये आनंद यांनी नेबादिमीर क्रैमनिक यास हरवून बुद्धिबळात परत एकदा यश प्राप्त केले.
- या खेळा नंतर आनंद हे बुद्धिबळ चॅम्पियनशिप मधील नॉक आउट, टूर्नामेंट व सामना खेळणारे वर्ल्ड बुद्धिबळ इतिहासाचे पहिले खेळाडू बनले.
- इसवी सन २०१० मध्ये विश्वनाथन यांचा खेळाचा सामना हा बुलगारिया या ठिकाणी दिग्गज वेसेलीन टोपालोव याच्यासोबत झाला. या खेळामध्ये विश्वनाथन आनंद यांनी वर्ल्ड बुद्धिबळ चॅम्पियनशिप हा किताब स्वतःच्या नावे पटकावला.
- विश्वनाथन यांच्या उत्कृष्ट प्रदर्शनाने त्यांना संपूर्ण विश्वामध्ये प्रसिद्धी प्राप्त झाले. यानंतर २०१३ ते २०१४ मध्ये विश्वनाथन यांच्यासाठी हे वर्ष थोडे निराशाजनक होते. कारण या काळात विश्वनाथन यांना मैग्नस कार्लन या खेळाडू कडून दोन वेळा हार पत्करावी लागली.
- याच कालावधी मध्ये, २०१८ मध्ये आनंद यांनी कोलकत्ता या ठिकाणी प्रथम टाटा स्टील बुद्धिबळ भारत ब्लिट्ज टूरमेंट हा किताब जिंकून नावलौकिक केले, त्या टूर्नामेंट मध्ये आनंद यांचा पहिला टप्पा हा चौथ्या स्थानावर होता. परंतु शेवटच्या दिवसात त्यांनी सहा वेळा जीत प्राप्त केली.
विश्वनाथन आनंद रेकॉर्ड
विश्वनाथन हे नावाजलेले व लोकप्रिय बुद्धिबळ चॅम्पियन आहेत त्यांच्या प्रमुख कामगिरी खालील प्रमाणे –
रेगिओ एमिलिया | १९९१ |
डॉस हर्मनेस | १९९७ |
विश्व चषक | २०००,२००२ |
डॉर्टमंड | १९९६ , २००० , २००५ |
मेलोडी अंबर स्पर्धा | १९९४ ,१९९७, २००३, २००७ |
लिनरेस | १९९८ ,२००७ |
कोर्सिका मास्टर्स | २०००, २००१, २००२, २००३, २००४, |
जागतिक स्पर्धा | २०००, २००७ |
torneo de madrid | १९९८ |
क्रेडिट स्विस मास्टर्स | १९९७ |
विश्वनाथन आनंद यांचे १९८० च्या दशकात सुरुवातीची कारकीर्द
आनंद यांनी वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी बुद्धिबळ क्षेत्रामध्ये कारकीर्द करण्यास सुरुवात केली. त्यावेळीत्यांचे वय हे अवघे पंधरा वर्षे होते. यानंतर वीस वर्षाखालील खेळाडूंसाठीच म्हणजे १९८४ मध्ये आशियाई ज्युनिअर चॅम्पियनशिप मध्ये, स्वतःचे स्थान निर्माण केल्यानंतर विश्वनाथन यांना आंतरराष्ट्रीय मास्टरही पदवी प्राप्त झाली.
त्यानंतर १९८६ ते १९८८ च्या दरम्याने भारतीय बुद्धिबळ चॅम्पियनशिप तसेच १९८७मध्ये जागतिक चॅम्पियनशिप आनंद यांनी जिंकली.
१९८८ मध्ये विश्वनाथन यांनी जीएम पदवी प्राप्त केली व १९९० मध्ये त्यांनी नेदरलँड या ठिकाणी व्हिजक आन झी येथे हूगोव्हेन्स स्पर्धेमध्ये अंतिम पाच मध्ये प्रथम स्थान पटकावले.
जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप २०००
दि. १९ सप्टेंबर २००७ मध्ये विश्वनाथन यांनी जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप या खेळामध्ये ते कोणत्याही वाद विवादाशिवाय ते विजेते ठरले.
तसेच त्यांना जगातील सर्वोच्च एलो रेटिंग असलेला खेळाडू म्हणून संबोधले गेले. या कालावधीमध्ये विश्वनाथन यांनी बुद्धिबळ क्षेत्रामधील अनेक पदके पटकवून स्वतःच्या नावे केली.
२००० मध्ये आनंद यांना जागतिक क्षेत्रातील पद प्राप्त झाले. आनंद यांनी दिल्लीमधील सुरुवातीची फेरी उत्तमरीत्या जिंकली व तेहरांन मध्ये ते अंतिम फेरीमध्ये पोहोचले.
विश्वनाथन आनंद व कास्पारोव्ह यांच्यातील सामना
- १९९५ मध्ये अवघ्या २५ वर्षाचे असताना आनंद यांनी कास्पारोव्ह सोबत बुद्धिबळ क्षेत्रात यशाचा झेंडा फडकवून, यश संपादन केले. विश्वनाथन यांनी या खेळामध्ये अतिशय महत्त्वाचा सामना खेळला. या खेळात कास्पारोव्हची एकूण गुण संख्या ०५ – ०५ अशी होती.
- या ठिकाणी ११ वा गेम हा या खेळाचा टर्निंग पॉईंट ठरला. कास्पारोव्हने ड्रॉपर ऑफर केला. आनंदाने त्यासाठी स्पष्टपणे नकार दर्शवला, यानंतर आनंद यांनी सर्वात मोठी चूक केली व तो हरला. इथे त्यांचे मनोबल खचले. कास्पारोव्हने दोन गेम जिंकले .
- हा जो २० खेळाचा सामना होता, तो केवळ १८ गेम मध्येच संपला. यामुळे आनंद यांचे पुनरागमन आता अवघड आहे असे लोकांना वाटू लागले. परंतु विश्वनाथन यांनी त्यांच्या खडतर प्रयत्नांनी वारंवार यश संपादन करून, प्रसिद्धी मिळवली.
पाच वेळा जगज्जेता पदाचे मानकरी
- इसवी सन २००० मध्ये आनंद यांनी फिडे स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावून, जगज्जेता पद प्राप्त केले. यानंतर स्पेनच्या अलेक्सी शिरोवला हिचा ३.५ ते ०.५ असा पराभव करून, त्यांनी विजय संपादन केला.
- यानंतर इसवी सन २००७ मध्ये आनंद यांनी मेक्सिको मध्ये झालेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकून एक नवीन विश्वविक्रम बनवला. आनंद यांनी दि. २९ सप्टेंबर २०१७ रोजी दुसऱ्यांदा जगज्जेता पद प्राप्त केले.
- त्यानंतर इसवी सन २००८ मध्ये आनंद यांनी रशियाच्या ब्लादिमीरी कैमिनीकला हरवून तिसऱ्यांदा जगज्जेता पद प्राप्त केले. असेच यशाची शिखर गाठत असताना, इसवी सन २०१० मध्ये विश्वनाथ आनंद यांनी टोपोलोव या प्रति स्पर्धकाला हरवून, पुन्हा एकदा चौथ्यांदा जगज्जेता पदाचे मानकरी झाले.
- इसवी सन २०१२ मध्ये विश्वनाथन यांनी, झालेली जागतिक स्पर्धा जिंकून जगज्जेता पद पुन्हा एकदा पाच वेळा स्वतःच्या नावे करून घेतले.
पुरस्कार आणि सन्मान
- १९९८ मध्ये विश्वनाथन यांना स्पोर्ट स्टार मिलेनियम अवॉर्ड देऊन, गौरवी करण्यात आले.
- १९८७ मध्ये विश्वनाथन यांना भारताचे सर्वश्रेष्ठ पद्मश्री पुरस्कार देऊन, गौरवीत केले गेले.
- १९९१ ते १९९२ मध्ये आनंद यांना राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार देऊन, गौरवित केले गेले.
- २००७ मध्ये विश्वनाथन यांना भारत सरकारकडून सर्वोच्च सन्मान पद्मविभूषण पुरस्कार देऊन, गौरवित केले गेले.
- १९८७ मध्ये विश्वनाथन यांना राष्ट्रीय नागरिक पुरस्कार व सोवियत लँड नेहरू पुरस्काराने सन्मानित केले गेले.
- १९८५ मध्ये विश्वनाथन यांना अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित केले.
विश्वनाथन आनंद यांचा वारसा
आनंद यांच्या बुद्धिबळातील लोकप्रियतेमुळे व यशामुळे बुद्धिबळ क्षेत्राला त्यांच्या जन्मस्थानी तसेच संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्धी प्राप्त झाली. देशाच्या इतिहासामध्ये आनंद हे पहिले बुद्धिबळातील ग्रँडमास्टर आहे, जे एक प्रसिद्ध व नावाजलेले बुद्धिबळपटू म्हणून सुद्धा ओळखले जातात.
पेंडयला हरिकृष्णा, हम्पी कोनेरू, कृष्णन शशी किरण, यांसारख्या प्रतिभांनी सुद्धा आनंद यांचे अनुसरण करून बुद्धिबळ क्षेत्रामध्ये नाव कमावले.
विश्वनाथन यांनी बुद्धिबळ खेळातील सर्वात वेगवान खेळाडूंपैकी एक म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले. २००३ व २०१७ मध्ये त्यांनी दोनदा वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप जिंकून, बुद्धिबळ क्षेत्रात एक उत्तम उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे बुद्धिबळ इतिहासातील आनंद हेच महान खेळाडून पैकी एक नाव आहे यात कोणत्याही प्रकारची शंका नाही.
विश्वनाथन आनंद यांच्या बद्दल मनोरंजक तथ्ये
- विश्वनाथन हे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू व जागतिक बुद्धिबळ खेळाडू आहेत.
- विश्वनाथन यांचा जन्म तमिळनाडूमधील एका ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला.
- विश्वनाथन यांच्या आई बुद्धिबळच्या प्रशिक्षक होत्या.
- त्यांचे वडील रिटायर्ड रेल्वे अधिकारी आहेत.
- आनंद यांना शिवकुमार व आराधना अशी भावंडे आहेत.
- त्यांच्या पत्नीचे नाव अरुणा आनंद आहे.
- आनंद यांना १ अपत्य आहे, ज्याचे नाव अखिल आहे.
- विश्वनाथन यांनी आईकडून बुद्धिबळाचे योग्य प्रशिक्षण घेतले.
विश्वनाथन आनंद यांच्या बद्दल १० ओळी
- आनंद हे भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे.
- विश्वनाथन यांचा जन्म दि. ११ डिसेंबर १९६९ मध्ये तमिळनाडू मधील चेन्नई या ठिकाणी झाला.
- लहानपणापासूनच ते बुद्धिबळ या खेळामध्ये अतिशय वेगवान व चाणक्य होते.
- वेगवान गतीमुळे, त्यांना लहानपणी लाईटनिंग कीड हे नाव मिळाले.
- विश्वनाथन हे १९८८ मध्ये भारताचे पहिले ग्रँडमास्टर बनले.
- आनंद यांनी पाच वेळा जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे.
- विश्वनाथन हे २८०० च्या एलोरेटिंगला मागे टाकणाऱ्या मोजक्याच खेळाडूंपैकी एक आहेत.
- आनंद यांना पद्मविभूषण, पद्मभूषण, अर्जुन पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार, प्राप्त झाले आहेत.
- राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार प्राप्त करणारे, विश्वनाथन आनंद हे पहिले भारतीय खेळाडू आहेत.
- विश्वनाथन यांना चेस ऑस्कर सहा वेळा मिळाला आहे.
FAQ
१. जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय कोण?
विश्वनाथन हे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू व जागतिक बुद्धिबळ खेळाडू आहेत.दि. १९ सप्टेंबर २००७ मध्ये आनंद यांनी जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप या खेळामध्ये ते कोणत्याही वाद विवादाशिवाय ते विजेते ठरले. तसेच त्यांना जगातील सर्वोच्च एलो रेटिंग असलेला खेळाडू म्हणून संबोधले गेले. या कालावधीमध्ये आनंद यांनी बुद्धिबळ क्षेत्रामधील अनेक पदके पटकवून स्वतःच्या नावे केली.
२. विश्वनाथन आनंद किती वेळा विश्वविजेता बनला?
विश्वनाथन आनंद यांनी पाच वेळा जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे.
३. विश्वनाथन आनंद कोण आहेत ?
विश्वनाथन आनंद हे बुद्धिबळाच्या विश्वातील एक नावाजलेले व्यक्तिमत्व असून, बुद्धिबळ जगाचा राजा म्हणून त्यांना संबोधले जाते. सप्टेंबर २०१७ मध्ये विश्वनाथ आनंद यांनी बुद्धिबळाचा विश्वविजेता बनण्याचा किताब जिंकला व तब्बल सात वर्षानंतर त्यांनी हा पराक्रम केला.
४. विश्वनाथन आनंद यांचा जन्म कधी व कूठे झाला ?
विश्वनाथन आनंद यांचा जन्म दिनांक ११ डिसेंबर १९६९ मध्ये तमिळनाडू मधील एका छोट्याशा शहरांमध्ये एका ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला. त्यांचे संगोपन चेन्नई मध्ये झाले.
५. विश्वनाथन आनंद यांना बुद्धिबळ खेळाची आवड कशी निर्माण झाली ?
विश्आवनाथन आनंद यांच्या आई सुशीला देवी या बुद्धिबळच्या प्रशिक्षक होत्या व एक प्रभावशाली समाजसेवक सुद्धा होत्या. विश्वनाथन आनंद यांना त्यांच्या आईमुळे बुद्धिबळ क्षेत्रामध्ये जास्त आकर्षण निर्माण झाले. त्यांनी त्यांच्या आईकडूनच बुद्धिबळ क्षेत्रातील योग्य प्रशिक्षण घेऊन, बुद्धिबळात स्वतःचे नाव कमावले.
६. विश्वनाथन आनंद यांना कोणते पुरस्कार प्राप्त झाले ?
विश्वनाथन आनंद यांना पद्मविभूषण, पद्मभूषण, अर्जुन पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार, प्राप्त झाले आहेत.
७. विश्वनाथन आनंद यांना चेस ऑस्कर किती वेळा मिळाला?
विश्वनाथन आनंद हे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू व जागतिक बुद्धिबळ खेळाडू आहेत. विश्वनाथन आनंद यांना चेस ऑस्कर सहा वेळा मिळाला आहे.
८ . भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोणाला बोलतात ?
वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी विश्वनाथन यांनी राष्ट्रीय सब ज्युनिअर चॅम्पियनशिप ची पदवी स्वतःच्या नावे केली. यानंतर आंतरराष्ट्रीय मास्टर ही पदवी मिळवणारे, विश्वनाथन आनंद हे तरुण भारतीय म्हणून नावाजले गेले. १९८८ मध्ये वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी भारताचा सर्वात तरुण ग्रँडमास्टर म्हणून विश्वनाथन आनंद यांची ओळख बनली. त्यांच्या या पराक्रमामुळे त्यांना बुद्धिबळाच्या इतिहासामध्ये एक अग्रगण्य स्थान प्राप्त झाले.
९. विश्वनाथन आनंद का प्रसिद्ध आहेत ?
विश्वनाथन हे बुद्धिबळाच्या विश्वातील एक नावाजलेले व्यक्तिमत्व असून, बुद्धिबळ जगाचा राजा म्हणून त्यांना संबोधले जाते. सप्टेंबर २०१७ मध्ये विश्वनाथ आनंद यांनी बुद्धिबळाचा विश्वविजेता बनण्याचा किताब जिंकला व तब्बल सात वर्षानंतर त्यांनी हा पराक्रम केला.
विश्वनाथन आनंद हे प्रमुख भारतीय बुद्धिबळपटू आहे. ज्यांनी जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप मध्ये पाच वेळा स्वतःचे स्थान निर्माण केले. नॉक आउट, स्पर्धा, सामना, या तीन प्रकारांमध्ये जागतिक चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावणारे, विश्वनाथन आनंद हे प्रमुख भारतीय आहे.
१०. विश्वनाथन यांच्या आई वडिलांचे नाव काय ?
दि. ११ डिसेंबर १९६९ मध्ये तामिळनाडू या ठिकाणी झालेल्या कृष्णमूर्ती विश्वनाथन अय्यर आणि श्रीमती सुशीला अय्यर यांच्या घरी जन्मलेल्या विश्वनाथन यांनी त्यांच्या त्यांच्या आईच्या अर्थ सुशीला अय्यर यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्धिबळ क्षेत्रामध्ये वाटचाल करण्यास सुरुवात केली.
निष्कर्ष
मित्रहो आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास बुद्धिबळाचा राजा विश्वनाथन आनंद यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला , हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद .