ताराबाई शिंदे माहिती मराठी | Tarabai Shinde Information In Marathi

ताराबाई शिंदे ह्या एकोणिसाव्या शतकामधील स्त्रीवादी लेखिका, कार्यकर्त्या होत्या. ज्यांनी अस्पृश्यता व जातीभेदाला नेहमीच विरोध केला. त्यांनी त्यांच्या स्त्री पुरुष तुलना या पुस्तकाच्या माध्यमातून समाजामधील प्रचलित चालत आलेल्या, रुढी परंपरांविषयी व स्त्री पुरुष विषमते विषयी प्रखडपणे भाष्य केले.

१८८२ मध्ये त्यांचे स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक प्रथमतः प्रकाशित झाले. आपल्या प्रकट विचारसरणीने ताराबाई शिंदे यांनी स्त्रीला पुरुषांसमान मान प्राप्त व्हावा व स्त्री ही पुरुषां इतकीच सन्मानाची पात्र आहे, असे स्त्री पुरुष तुलना या पुस्तकाद्वारे ताराबाई शिंदे यांनी संपूर्ण जगासमोर आणले.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास ताराबाई शिंदे यांच्या बद्दल माहिती दिलेली आहे, ही माहिती व हा लेख जाणून घेण्यासाठी, शेवटपर्यंत नक्की वाचा.

Table of Contents

ताराबाई शिंदे माहिती मराठी | Tarabai Shinde Information In Marathi

नाव ताराबाई शिंदे
जन्म तारीख इसवी सन १८५०
जन्म स्थळ बुलढाणा
प्रसिद्धी एक स्त्रीवादी लेखिका
राष्ट्रीयत्व भारतीय
धर्म हिंदू
मृत्यू इ. स. १९१०

कोण होत्या ताराबाई शिंदे ?

  • वऱ्हाड प्रांतातील १८५० मध्ये जन्माला आलेल्या, ताराबाई शिंदे यांचा परिचय करून घेणार आहोत, ताराबाई शिंदे यांच्या वडिलांचे नाव बापूजी हरी शिंदे,बुलढाण्यामध्ये चार गडी होते, त्यातली एक गडी ही या बापूजी शिंदे यांची होती.
Tarabai Shinde Information In Marathi
  • त्यांना चार मुलगे आणि एक मुलगी. निश्चितच या मुलीचे या माहेरी भरपूर लाड झाले. मुख्य म्हणजे बापूजी हरी शिंदे हे सत्यशोधक समाजाचे सभासद होते.
  • शैक्षणिक विचारांचे बापूजी शिंदे यांनी आपल्या मुलांबरोबरच आपल्या मुलीला मराठी, संस्कृत आणि इंग्रजी भाषा शिकायला प्रवृत्त केले. या तीनही भाषा खेड्यातल्या या मुलीला अवगत होत्या. इतकच नव्हे तर, त्यांचे वडील विविध पुस्तक, वृत्तपत्र आणि त्याचबरोबर लोकहितवादी यांचे लेख आपल्या मुलीला वाचायला देत असत.
  • त्याचबरोबर सत्यशोधक समाजाच्या ज्योतिराव फुले यांनी लिहिलेले लेख, त्यांची आक्रमक शैली, परखड भाषा ताराबाई यांच्या वाचनात येऊ लागले आणि त्यातूनच तिच्या स्त्रीमुक्ती विचारांना कुठेतरी बळकटी मिळाली.

ताराबाई शिंदे यांचे कुटुंब व बालपण

ताराबाई यांचा जन्म १८५० मध्ये बापूजी हरी शिंदे यांच्या घरी, बुलढाणा या ठिकाणी झाला. त्यांचे वडील बापूजी हरी शिंदे सत्यशोधक समाजाचे सदस्य होते.

बापूजी हरी शिंदे यांनी महसूल उपायुक्त कार्यालयामध्ये मुख्य लिपिक म्हणून कार्य केले. ताराबाई ही बापूजी हरी शिंदे यांची एकुलती एक कन्या व तिच्या पुढे चार भाऊ होते. परंतु वडिलांनी मुलांप्रमाणे, ताराबाई शिंदे यांना संस्कृत व इंग्रजी तसेच मराठी भाषांचे ज्ञान दिले.

Tarabai Shinde

ताराबाई शिंदे यांचे वैयक्तिक जीवन

ताराबाई यांच्या वडिलांनी अगदी बाल वयातच ताराबाई शिंदे यांचा विवाह त्यांना न आवडणाऱ्या व्यक्तीशी म्हणजेच नारायण चव्हाण यांच्यासोबत करून दिला.

ताराबाई शिंदे यांचे सामाजिक क्षेत्रामध्ये मोलाचे कार्य

  • ताराबाई ह्या सत्यशोधक समाजाच्या सदस्या होत्या. ज्याची स्थापना खुद्द समाज सुधारक ज्योतिराव फुलेसावित्रीबाई फुले यांनी केली होती.
  • सावित्रीबाई व ज्योतीबा फुले प्रमाणेच ताराबाई यांनी सुद्धा जातीभेद, स्त्री पुरुष विषमता, यांच्या विरोधात समाजामध्ये आवाज उठवण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
  • १७७९ च्या फ्रेंच क्रांतीने जागतिक महिला चळवळीचा पाया रचला. याचे मुख्य कारण महिलांना नागरिक म्हणून एक समान अधिकार समाजामध्ये प्राप्त व्हावा. या क्रांतीनंतर, संपूर्ण जग हळूहळू पूर्णतः स्थिरपणे स्त्रियांना समाजाच्या भयावह स्थितीबद्दल शिक्षित करत होते.
  • ताराबाई यांच्या समवेत भारतातील, स्त्री शिक्षणाची वकिली करणाऱ्या पहिल्या महिला सावित्रीबाई फुले, सत्यशोधक समाज संस्थापक ज्योतिबा फुले ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी या कार्यामध्ये महत्त्वाचे योगदान दिले.

हे वाचा –

ताराबाई लहानपणापासून असमानतेच्या विरोधात होत्या

ताराबाई या बालपणापासूनच असमानता, स्त्री-पुरुष विषमता, जातीभेद, इत्यादी. सामाजिक असमानतेच्या विरोधात होत्या. ताराबाई यांनी त्यांच्या लेखनातून समाजातील असमानता, स्त्री पुरुष तुलना, या पुस्तकाद्वारे मांडल्या.

ताराबाई शिंदे

त्याचप्रमाणे स्त्रीला सुद्धा पुरुषांप्रमाणे समान अधिकार आहेत व स्त्री सुद्धा पुरुषांप्रमाणे कार्य करण्यास समर्थ आहे, असे स्पष्ट वक्तव्य व लिखाण ताराबाई यांनी त्यांच्या लेखनातून केले.

ताराबाई शिंदे यांची क्रांतिकारी विचारधारा

  • ताराबाई यांनी समाजामधील जातीभेद स्त्री-पुरुष विषमता यांना कडाडून विरोध केला व ही प्रचलित प्रथा बंद करण्यासाठी त्याने संपूर्ण जीवन लढा देऊन स्त्री पुरुष विषमता संपवण्याचा प्रयत्न केला.
  • स्त्री पुरुष तुलना या ताराबाई यांच्या रोखठोक पुस्तकाद्वारे, ताराबाई यांनी समाजामधील प्रचलित जातीभेद, असमानतेची विचारधारा, इत्यादी मुद्दे स्पष्टपणे मांडून, समाजाला या गोष्टी बदलण्याची गरज आहे, असे स्पष्ट वर्णन केले.
  • ताराबाई या थोर समाज सुधारक व क्रांतिकारी होत्या. ज्यांनी महिलांना सुद्धा, समाजामध्ये पुरुषांप्रमाणे समान हक्क आहे. याची जाणीव करून दिली.
  • ताराबाईंनी आपल्या परखड लेखणी, कलाकृती व क्रांतीकारी विचारसरणीच्या द्वारे इसवी सन १९ व्या शतकात संपूर्ण भारतामध्ये, पसरलेल्या विषारी घटकावर मात करण्याचा प्रयत्न केला व त्यामध्ये त्या यशस्वी सुद्धा झाल्या.

ताराबाई शिंदे यांचे सामाजिक सेवेमध्ये कार्य

१८४८ मध्ये दलित जातीतील मुलींसाठी पहिली शाळा उभारण्यात आली. यानंतर १८५४ च्या दरम्याने उच्चवर्णीय विधवांसाठी आश्रय स्थानाची स्थापना ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी करण्याचा प्रयत्न केला.

ताराबाई यांनी सुद्धा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांच्या आधारे व लेखा द्वारे प्रभावित होऊन, समाजामध्ये स्त्री पुरुष समानता यावी व समाज अनिष्ट रूढी परंपरांपासून मुक्त भावा यासाठी महत्त्वाचे कार्य केले.

ताराबाई शिंदे यांचे कार्य

  • तत्कालीन महाराष्ट्रातील, स्त्री समाजसुधारक म्हणून ताराबाई यांचा उल्लेख केला जातो. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये, सामाजिक सुधारण्याच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
  • ताराबाई यांनी स्त्रियांच्या शोषणाविरुद्ध दिलेला लढा हा सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेस चालना देणार आहे. स्त्रियांच्या अधिकार प्राप्तीच्या हेतूने त्यांनी स्त्री पुरुष तुलना लिहिल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे.
  • त्याचबरोबर ताराबाई यांनी विधवांच्या जीवनाचे विदारक चित्र या लेखनामध्ये रेखाटले आहे. विवाहित स्त्रियांवर होणारे अत्याचार आणि मुलींच्या लग्नाच्या विचित्र बाबी हि त्यांनी या अनुषंगाने सांगितलेले आहे.
  • एकूण स्त्रियांच्या वाट्याला येणाऱ्या, यमयातणा मुळे ताराबाई यांचे मन विशन्न झाले होते. म्हणून त्यांनी तीन पृष्ठांची प्रस्तावना आणि ४९ पृष्ठांचे विवेचन, असा ५२ पानाचा निबंध लिहिला.
  • स्त्री, पुरुष पेक्षा अधिक शोषित, अल्पसंतुष्ट, असते. तरी सुद्धा स्त्रियांच्या वाट्याला अपेक्षा, वंचना शोषण व यातना येतात, त्याचा ताराबाई यांना प्रचंड त्रास होतो. म्हणून त्या पोटटिडकिने लेखन करतात.
  • ताराबाई यांनी इंग्रज सरकारचे राज्य ईश्वर राज्य असे राज्य चिरकाल ठेवो अशी इच्छा व्यक्त केली होती. कारण इंग्रजांच्या राजवटीमध्ये बहुतांश भौतिक सुधारणा झाल्या होत्या.
  • ताराबाई शिंदे विधवांच्या पुनर्विवाहाच्या हक्काच्या एक कट्टर समर्थक होत्या. त्यांनी त्यांच्या लिखाणामध्ये, विधवांनी सहन केलेल्या क्रूर अत्याचाराबद्दल लेखन केले आहे.
  • बालविवाह, जातीवर आधारित व उत्पन्नावर आधारित विवाह, या प्रथा व या चालीरीती मोडून काढण्यासाठी, ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या समवेत, ताराबाई यांनी सुद्धा अथक परिश्रम करून महत्त्वपूर्ण योगदान दिले.

ताराबाई शिंदे कोणावर प्रभावित होत्या ?

ताराबाई यांच्या जडणघडणीत महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार, भाषा, सुधारक विचार, व्यापक समानतेचा पुरस्कार, त्याचबरोबर आक्रमक व्यक्तीचा प्रभाव होता.

ताराबाई शिंदे आणि महात्मा ज्योतिबा फुले

तसेच ताराबाई यांचे व्यक्तिमत्व शिक्षणामुळे विकसित झाले. त्यांना मराठी, संस्कृत, इंग्रजी, अशा भाषा अवगत होत्या.

ताराबाई शिंदे वाद

ताराबाई यांनी लिहिलेल्या स्त्री पुरुष तुलना या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर, काही दिवसांनी ताराबाईंचे स्त्री पुरुष तुलना पुस्तक हे प्रचंड निंदा आणि विरोधाचा विषय बनला.

स्थानिक वृत्तपत्राद्वारे ताराबाई यांच्या या पुस्तकाची विटंबना करणारे काही मजकूर प्रकाशित करण्यात आले.

स्त्रीवाद चळवळ

स्त्रीवाद ही चळवळीची प्रचंड लाट आहे. ज्याचा मुख्य उद्देश, महिलांना पुरुष वर्गाच्या सर्वोच्च ते पासून सामाजिक, राजकीय, वैयक्तिक व आर्थिक मुक्ती मिळवून देण्याच्या उद्देशाने निर्मित केली आहे. १९  व्या शतकामध्ये भारतीय उपखंडात स्त्रीवाद चळवळ पहिल्यांदाच उदयास आली.

या चळवळीचे मुख्य कारण होते की, भारतातील स्त्रियांमध्ये सक्तीची विधवात्व व सती, बालविवाह, शिक्षण नाकारणे आणि तर सामाजिक, सांस्कृतिक प्रतिबंधांच्या जुन्या प्रथाविरुद्ध मोठ्या प्रमाणावर विरोध झाला.. भारतीय स्त्रीवादाच्या प्रवर्तकामध्ये, ताराबाई यांचे कार्य अतुलनीय व अविस्मरणीय आहे.

ताराबाई शिंदे यांच्या लेखनाचा प्रभाव

ताराबाई यांचे स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक अतिशय क्रांतिकारी व महिलांना न्याय प्राप्त करून देणारे होते. ताराबाई यांचा भारतातील स्त्रीवादी चळवळीवर असा परिणाम झाला की, समाजातील नियमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून, स्त्रियांना भेडसावणाऱ्या असमानतेवर प्रकाश टाकून, ताराबाई यांनी गंभीरपणे रुजलेल्या पुरुष सत्ताक रचनेला प्रचंड आवाहन दिले.

ताराबाई यांच्या कार्याने भविष्यातील स्त्रीवादी विचारवंत आणि कार्यकर्त्यांसाठी एक उत्तम मार्ग प्रशस्त केला. स्त्रियांच्या संवादाला चालना प्राप्त करून दिली, महिलांच्या हक्काच्या वकिलीचा पाया ताराबाई यांनी रचला.

ताराबाई शिंदे यांच्या बद्दल थोडक्यात माहिती

  • ताराबाई ह्या मूळच्या बुलढाण्यातला, त्यांचे वडील बापूजी हरी शिंदे हे जमीनदार. बापूजी शिंदे सत्यशोधक समाजाचे सदस्य होते. त्यामुळेच स्त्री पुरुष समानते विषयीची असणारी ओढ व भावना ताराबाईंच्या मनामध्ये लहानपणापासूनच होती.
  • त्यांच्या शिक्षणामुळे, ज्योतिबा फुले यांच्या लेखांमुळे, ताराबाई प्रभावित होऊन, त्यांचे व्यक्तिमत्व घडण्यास उत्तम मदत झाली. ताराबाई शिंदे यांनी केवळ इंग्रजी विषय न निवडता, संस्कृत व मराठी विषयाचा सुद्धा सखोल अभ्यास केला.
  • शालेय शिक्षणामुळे त्यांना वाचनाची प्रचंड आवड झाली. ताराबाई यांना घोडेस्वार, करण्यास प्रचंड आवडायचे. त्याचबरोबर ताराबाई यांनी कृषी तसेच न्यायव्यवस्था या दोन्ही क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी केली.
  • लहान वयातच मुलींचा बालविवाह करून, मोठेपणी मुली विधवा झाल्यास, त्यांना दिल्या जाणाऱ्या विविध हानीनचा विचार करून, ताराबाई यांनी स्त्री पुरुष तुलना या विषयावर आधारित पुस्तक लिहिले.
  • १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात ताराबाई यांच्याकडे एक धाडसी व स्त्रीवादी लेखिका म्हणून पाहिले जात होते. ताराबाई यांच्याकडे स्त्रियांप्रमाणेच, पुरुषांमध्ये सुद्धा दुर्गुण असू शकतात, हे मान्य करण्याच्या आणि त्यासाठी समाजाला जबाबदार धरण्याची हिंमत होती.
  • एकोणिसाव्या शतकामधील ताराबाई या एक बंडखोर स्त्री होत्या. ज्यांनी किमान हजार वर्षांपासून प्रचलित असलेल्या, समाज रचनेच्या विविध चालीरीतींवर प्रश्न निर्माण करण्याची हिम्मत दाखवली.
  • ताराबाई यांच्याकडे बुद्धिमत्ता, वक्तृत्व, स्त्रियांच्या दुर्दशेबद्दल आस्था होती. सावित्रीबाई व महात्मा फुले यांच्या विचारांनी प्रभावित होऊन, त्यांनी समाजामध्ये समानता निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
  • ताराबाई या वाचक होत्या. वर्तमानपत्रे, पुस्तके, संतांच्या कविता, विचारधारेवरील निबंध, मासिके, महात्मा फुले यांचे लेख, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे लेखन, ताराबाईंनी अतिशय सखोल रित्या वाचले. त्यांचा परिणाम ताराबाई यांच्या मनावर सखोलरित्या झाला व आपल्या देशामध्ये सुद्धा अनिष्ट रूढींना आळा बसायला पाहिजे, याचा विचार करत त्यांनी सुद्धा क्रांतीचे पाऊल उचलले.
  • महात्मा फुले यांच्या सत्सार या नियतकालिकेच्या दुसऱ्या आवृत्तीत, ताराबाई यांच्या मनाच्या तेजामुळे व बोलण्याच्या धाडसीपणामुळे त्यांना कौतुक प्राप्त झाले.

ताराबाई शिंदे मृत्यू

ताराबाई यांचा इसवी सन १९१० मध्ये निधन झाले.

ताराबाई शिंदे – स्त्री पुरुष तुलना पुस्तक

  • ताराबाई यांनी एकमेव पुस्तक लिहिलंय आणि त्या पुस्तकाचं नाव आहे, स्त्री पुरुष तुलना. या पुस्तकातील त्यांच्या विचारांमुळेच, आज आपल्याला त्यांचा परिचय करून घ्यावासा वाटतोय, ताराबाईंनी नेमकं या पुस्तकात कोणते विचार मांडले, ते आपण आज पाहणार आहोत –
  • १८८२ मध्ये ताराबाई यांनी स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहिलं, पण हे पुस्तक लिहिण्यामागे जी प्रेरणा होती ती म्हणजे त्याकाळी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये छापून आलेली, एक बातमी.
  • सुरत मध्ये एका ब्राह्मण स्त्रीने भ्रूणहत्या केल्यावर, तिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. परंतु काही संस्थांच्या खटपटीमुळे, फाशी न देता तिला पाच वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा झाली. या बातमीनंतर, पुणे वैभव या वृत्तपत्राने समस्त स्त्री वर्गावर टीकेची झोड उठवली.
  • याची मनस्वी चीड ताराबाईंना आली. कारण त्याकाळी विधवेला पुनर्विवाहाचा हक्क दिला नव्हता आणि जन्माला घातलेल्या मुलाला समाज स्वीकारत नव्हतं, ही जाणीव असूनही, पुरुषवर्गाकडून स्त्री वर्गावर केली जाणारी टीका या पुस्तकाला जन्म द्यायला कारणीभूत ठरली.
  • ताराबाई यांचे हे पुस्तक दोन भागात विभागले आहे. पहिल्या भागामध्ये स्त्री पुरुष विषमता, त्यांनी स्त्रीला कसं गुलाम करून सोडलं, यावर त्यांनी लिखाण केले आहे, तर दुसऱ्या भागात पुरुषांकडून स्त्री जातीला लावली गेलेली दुषणे, त्यांच्यावर ठोकवलेले दोष, पुरुषांमध्ये कसे अधिक दिसून येतात ते उदाहरणे देऊन त्यांनी सांगितलेलं आहे.
  • आपल्या पुस्तकात ताराबाई म्हणतात , निसर्गतः स्त्री-पुरुष समान आहेत. परमेश्वराने त्यांची निर्मिती परस्पर आनंदासाठी केली.
  • तेव्हा दोघांनाही नीती नियम सारखेच लागू होतात. अस असतानाही बाप जर आपल्या कोवळ्या वयातल्या मुलीचा, विवाह एखाद्या म्हाताऱ्याची लावून देत असेल, त्याची श्रीमंती बघून आयुष्यभर आपल्या मुलीला पोटभर जेवायला मिळेल, हा विचार करून लावून देत असेल, तर ही मुलगी वयात येताच, विधवा होणार नाही का ? आणि विधवा होणं हे त्या काळी घोर पातक मानलं जात होत.
  • महा अपराध्यासारखं तिला तोंड काळ करावं लागतं, तिचं केशवपण केलं जातं, तिची सौभाग्य लेणी काढून घेतली जातात, तिच्यावर उपास तपासाचे बंधन लागधल जातं.
  • ताराबाई म्हणतात, तुम्ही ह्या कितीही गोष्टी केल्या तरी, तारुण्य जिच्या पदरात आहे, तिने आपलं आयुष्य कसं जगावं ? हा कामवासनेशी निगडित असा विषय, त्याकाळी या विषयावर बोलणं सुद्धा, निषिद्ध मानलं जात होतं, त्या काळात पुरुषाप्रमाणे, स्त्रीलाही कामभावना किंवा इच्छा आहे, ही जाणीव ताराबाईंनी या पुस्तकातून करून दिलेली आपल्याला दिसते.
  • पुरुषांच्या बोलताना त्या म्हणाल्या, तुमची जर बायको मेली तर तेराव्या दिवशीच तुम्ही दुसरं लग्न करता, मग स्त्रीप्रमाणे तुम्ही सुद्धा दाढ्या मिशा काढून, अंधार कोठडीत का बसत नाही ? नियम म्हटल्यावर, तो दोघांनाही सारखा असावा, असे सडेतोड परखड विचार स्त्री पुरुष तुलना या पुस्तकांमध्ये, ताराबाईंनी मांडलेले आपल्या दिसतात.
  • मूलभूत विचार करणाऱ्या ताराबाईंनी या पुस्तकातून, बुरशी वर्चस्वाला रोकडे आव्हान दिले आहे.
  • इतकच काय तर, देवापासून धर्म मारण्या पर्यंतच्या सर्व कारस्थानांची चिरफाड या पुस्तकात त्यांनी केली आहे. असे हे त्यांचे स्फोटक विचार, त्यांची परखड भाषा, त्याकाळी समाजाला पेलवणारी नव्हती हे पुस्तक अस्तंगत होत असतानाच, सखाराम गंगाधर मालशे यांच्या हे नजरेस आलं आणि त्यांनी ताराबाई यांचे एकमेव पुस्तक, पुन्हा प्रकाशित केले.
  • हे पुस्तक वाचल्यावर, आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की, आज स्त्रीमुक्ती आणि समान हक्काचा विचार करताना, ही जाणीव किंवा हे विचार फार पूर्वीच म्हणजे, १८८२ मध्ये ताराबाई यांनी व्यक्त केलेले आपल्याला दिसून येतात.

FAQ

१. स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?

ताराबाई शिंदे या बालपणापासूनच असमानता, स्त्री-पुरुष विषमता, जातीभेद, इत्यादी. सामाजिक असमानतेच्या विरोधात होत्या. ताराबाई शिंदे यांनी त्यांच्या लेखनातून समाजातील असमानता, स्त्री पुरुष तुलना, या पुस्तकाद्वारे मांडल्या.

२. ताराबाई शिंदे यांचे योगदान?

१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात ताराबाई शिंदे यांच्याकडे एक धाडसी व स्त्रीवादी लेखिका म्हणून पाहिले जात होते. ताराबाई शिंदे यांच्याकडे स्त्रियांप्रमाणेच, पुरुषांमध्ये सुद्धा दुर्गुण असू शकतात, हे मान्य करण्याच्या आणि त्यासाठी समाजाला जबाबदार धरण्याची हिंमत होती.एकोणिसाव्या शतकामधील ताराबाई शिंदे या एक बंडखोर स्त्री होत्या. ज्यांनी किमान हजार वर्षांपासून प्रचलित असलेल्या, समाज रचनेच्या विविध चालीरीतींवर प्रश्न निर्माण करण्याची हिम्मत दाखवली.

३. स्त्री पुरुष तुलाना मध्ये काय लिहिले होते?

ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलाना हे पुस्तक दोन भागात विभागले आहे. पहिल्या भागामध्ये स्त्री पुरुष विषमता, त्यांनी स्त्रीला कसं गुलाम करून सोडलं, यावर त्यांनी लिखाण केले आहे, तर दुसऱ्या भागात पुरुषांकडून स्त्री जातीला लावली गेलेली दुषणे, त्यांच्यावर ठोकवलेले दोष, पुरुषांमध्ये कसे अधिक दिसून येतात ते उदाहरणे देऊन त्यांनी सांगितलेलं आहे.

४. 1882 मध्ये प्रकाशित झालेले स्त्री पुरुष तुला नावाचे पुस्तक कोणी लिहिले आहे?

१८८२ मध्ये ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहिलं.

५. ताराबाई शिंदे यांच्यावर कोणाचा प्रभाव होता ?

ताराबाई शिंदे यांच्या जडणघडणीत महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार, भाषा, सुधारक विचार, व्यापक समानतेचा पुरस्कार, त्याचबरोबर आक्रमक व्यक्तीचा प्रभाव होता.

६. ताराबाई शिंदे यांचा जन्म कधी झाला ?

ताराबाई शिंदे यांचा जन्म १८५० मध्ये बापूजी हरी शिंदे यांच्या घरी, बुलढाणा या ठिकाणी झाला.

७. ताराबाई शिंदे यांचा मृत्यू कधी झाला ?

ताराबाई शिंदे यांचा इसवी सन १९१० मध्ये निधन झाले.

८. कोण होत्या ताराबाई शिंदे ?

ताराबाई शिंदे ह्या एकोणिसाव्या शतकामधील स्त्रीवादी लेखिका, कार्यकर्त्या होत्या. ज्यांनी अस्पृश्यता व जातीभेदाला नेहमीच विरोध केला. त्यांनी त्यांच्या स्त्री पुरुष तुलना या पुस्तकाच्या माध्यमातून समाजामधील प्रचलित चालत आलेल्या, रुढी परंपरांविषयी व स्त्री पुरुष विषमते विषयी प्रखडपणे भाष्य केले.

९. ताराबाई शिंदे यांच्या लेखनाचा समाजावर काय प्रभाव पडला ?

ताराबाई शिंदे यांचा भारतातील स्त्रीवादी चळवळीवर असा परिणाम झाला की, समाजातील नियमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून, स्त्रियांना भेडसावणाऱ्या असमानतेवर प्रकाश टाकून, ताराबाई शिंदे यांनी गंभीरपणे रुजलेल्या पुरुष सत्ताक रचनेला प्रचंड आवाहन दिले. ताराबाई शिंदे यांच्या कार्याने भविष्यातील स्त्रीवादी विचारवंत आणि कार्यकर्त्यांसाठी एक उत्तम मार्ग प्रशस्त केला. स्त्रियांच्या संवादाला चालना प्राप्त करून दिली, महिलांच्या हक्काच्या वकिलीचा पाया ताराबाई शिंदे यांनी रचला.

१०. ताराबाई शिंदे यांच्या पतीचे नाव काय ?

ताराबाई शिंदे यांच्या वडिलांनी अगदी बाल वयातच ताराबाई शिंदे यांचा विवाह त्यांना न आवडणाऱ्या व्यक्तीशी म्हणजेच नारायण चव्हाण यांच्यासोबत करून दिला.

११. ताराबाई शिंदे यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान काय?

ताराबाई शिंदे ह्या सत्यशोधक समाजाच्या सदस्या होत्या. ज्याची स्थापना खुद्द समाज सुधारक ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी केली होती. सावित्रीबाई व ज्योतीबा फुले प्रमाणेच ताराबाई शिंदे यांनी सुद्धा जातीभेद, स्त्री पुरुष विषमता, यांच्या विरोधात समाजामध्ये आवाज उठवण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

१२. ताराबाई शिंदे यांच्या वडिलांचे नाव काय ?

ताराबाई शिंदे यांचे वडील बापूजी हरी शिंदे सत्यशोधक समाजाचे सदस्य होते. बापूजी हरी शिंदे यांनी महसूल उपायुक्त कार्यालयामध्ये मुख्य लिपिक म्हणून कार्य केले.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखा द्वारे आम्ही आपणास ताराबाई शिंदे यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा, लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment