राजा राम मोहन रॉय माहिती मराठी Raja Ram Mohan Roy Information In Marathi

राजा राम मोहन रॉय यांच्या बद्दल सांगायचं झालं तर, त्यांना आधुनिक भारतातील प्रबोधनाचे जनक म्हणतात. हे महाराष्ट्रातील समाज सुधारक जरी नसले तरी, यांनी स्थापन केलेल्या ब्राह्मो समाजाचा पगडा हा प्रार्थना समजला होता.

राजा राम मोहन रॉय यांचा संपूर्ण जीवनपट म्हणजे खडतर प्रवास होता. कारण प्रवाहासोबत धावणे, प्रवाहा सोबत चालणे, खूप सोपं जातं. पण प्रवाहाच्या विरुद्ध जाणाऱ्याला नेहमी त्रास होतो.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास राजा राम मोहन रॉय यांच्याबद्दल माहिती दिली आहे. हि माहिती आणि हा लेख जाणून घेण्यासाठी खालील लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

राजा राम मोहन रॉय माहिती मराठी Raja Ram Mohan Roy Information In Marathi

नाव राजा राम मोहन रॉय
जन्म तारीख २२ मे १७७२
जन्म स्थळ बंगाल
ओळख आधुनिक भारतातील प्रबोधनाचे जनक
आईचे नाव तारिणी देवी
वडिलांचे नाव रमाकांत रॉय
मृत्यू २७ सप्टेंबर १८३३ मध्ये
मृत्यू ठिकाण इंग्लंड मधील ब्रिस्टॉल

कोण होते राजा राम मोहन रॉय ?

राजा राम मोहन रॉय एकेश्वर वादाला पाठिंबा देणारी व्यक्ती होते. याचा अर्थ म्हणजे सर्व धर्म जाती जरी वेगवेगळ्या असल्या तरी, ईश्वर एकच आहे आणि सर्वधर्म, जात, पंथ, एकाच ईश्वरीची पूजा करतात.

Raja Ram Mohan Roy Information In Marathi

सध्या जरी आपण आपल्या समाजात बघितले, तर आपल्या लक्षात येते की, भारतात अजूनही जातीभेद पाळला जातो. त्यामुळे राजा राम मोहन रॉय यांनी प्रथम समाजापर्यंत एक गोष्ट पोचली ती म्हणजे ईश्वर एक आहे आणि आपण एकाच ईश्वरची पूजा केली पाहिजे.

हे वाचा –

यावर १८०९  साली त्यांनी एक ग्रंथ लिहिला, या पुस्तकात त्यांनी सांगितले आहे की, आपल्याला आपल्या सर्व अपेक्षा आणि सर्व संकल्पना, एका ईश्वराकडे वळवल्या पाहिजेत. हे पुस्तक त्यांनी पर्शियन भाषेत लिहिले आहे.

कारण त्या काळात कोड लँग्वेज पर्शियन भाषा होती, पण यामध्ये एक चूक झाली, हे पुस्तक सामान्य जनतेसाठी होते, पण सामान्य जनतेला पर्शियन भाषा समजत नव्हती, तर हेच पुस्तक बंगाली भाषेमध्ये जरी असले, तरी काही भारतीयांना समजलं असतं. त्यांनी समाजप्रबोधनाचे काम साहित्याच्या माध्यमातून सुद्धा करण्यात सुरुवात केली.

पुढे रॉय यांनी वेदांना आणि उपनिषदांना बंगाली भाषेत भाषांतरित केलं. कारण त्यांना समाजाला एकेश्वर वादाला पटवून द्यायचे होते. आपले वेद आणि उपनिषद सुद्धा एकेश्वर वादावर अवलंबून आहेत.

त्यामुळे या साहित्याचे, त्यांनी भारतीय भाषेमध्ये भाषांतर केलं. पण संपूर्ण समाजात ही गोष्ट पसंती जात नव्हती, कारण भारतातील मोठा भाग अजून अशिक्षित होता. भारतीय समाजाला हे समजणे कठीण होते.

शिक्षणाच्या कमतरतेमुळे भारतीय समाजाकची अशी परिस्थिती झाली होती, पुढे जाऊन राजा राम मोहनरा यांनी १८१४ साली आत्मसभाची स्थापना केली. जे जे लोक या आत्म्य सभेमध्ये सहभागी होते ते पुढे जाऊन समाजामध्ये एकेश्वर वादाचा प्रसार करत.

जातीभेदाला या आत्म्य सभेमध्ये थारा नव्हता. समाजातील अनिष्ट प्रथा, परंपरा आणि अंधश्रद्धेला सुद्धा या संघटनेत त्यांनी जागा दिली नाही. त्यांनी समाजाला पटवून दिले, आपले वेद आहेत ते तर्क शुद्ध संकल्पनावर आधारलेले आहेत.

त्यांनी जनतेला अनिष्ट रूढी परंपरेवर, प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. कारण समाजातील काही परंपरा समाजावर कोणताही आधार नसताना, लादण्यात आलेले आहेत हे त्यांच्या लक्षात आलं.

समाजामध्ये अनिष्ट रूढी, परंपरा तर होत्याच आणि भारतीय समाजामध्ये समाज प्रबोधनाचे जे कार्य करत होते, यांच्यावर भारतातील ख्रिश्चन मिशनरी खुश होते, कारण त्यामुळे हिंदू धर्मातील असणारी कमतरता भारतीय जनतेच्या लक्षात आली होती, त्यामुळे ख्रिश्चन मिशन त्यांचा धर्माचा प्रसार करताना, या गोष्टीचा फायदा होणार होता.

पण रॉय यांच्या पुढच्या एका चालीमुळे, ख्रिश्चन मिशनच्या या स्वप्नांवर पाणी फेरले. त्यांनी १८२० मध्ये एक पुस्तक लिहिलं परसेप्स ऑफ जीजस, यामध्ये त्यांनी न्यू स्टेस्टमेन्ट मधील ज्या अतरिक्त गोष्टी होत्या, त्यांना जीजसच्या चमत्कारी गोष्टींपासून वेगळे केले.

ख्रिश्चन धर्मात असणाऱ्या नैतिक आणि अध्यात्मिक गोष्टींचे त्यांनी स्वागतच केले. त्यांनी याचा स्वीकार भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा केला जावा असा विचार समाजासमोर मांडला आणि या सर्व कार्यामुळे, समाज प्रबोधनामुळे ख्रिश्चन मिशनरी आता नाराज झाले होते. पण यांनी आपल्या समाजप्रबोधनाचे कार्य पुढे चालू ठेवले.

त्यानंतर १८२८ मध्ये राजा राम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. आधी या समाजाचे नाव वेगळे होते, थोड्याच कालावधीनंतर या समाजाचे नाव ब्राह्मो समाज करण्यात आले. हिंदू धर्माचे शुद्धीकरण करणे आणि एकेश्वर वादाचा प्रसार करण्याचा या ब्राह्मो समाजाचा उद्देश होता.

ब्राह्मो समाज आधुनिक विचारांचे संवर्धन करत होता. तर वेद, उपनिषद हे या समाजाचे आधारस्तंभ होते. हा समाज दोन गोष्टींवर आधारलेला होता.

पण या सुधारणांना आणि या समाजाला विरोध करण्यासाठी सनातन आणि समाज उभा होता. त्यांनी ब्राह्मो समाजाला विरोध करण्यासाठी धर्मसभेची स्थापना केली. या सभेच्या स्थापनेमध्ये राधाकंद होते.

धामू समाजाचे पतन करणे, हे या समाजाचे ध्येय होते. पण १८३३ मध्ये रॉय यांचा मृत्यू झाला. रॉय यांनी भारतीय समाजातील प्रत्येक घटकांसाठी समाज प्रबोधनाचे कार्य केले.

त्यांनी हिंदू धर्माच्या सुधारण्यासाठी, संपूर्ण आयुष्य घालवले. यांनी समाजाच्या एकाच घटकांवर लक्ष केंद्रित न करता, इतर सर्व घटकांवर लक्ष केंद्रित करून समाज प्रबोधनाचे कार्य केले. त्याचबरोबर त्यांनी स्त्रियांच्या उन्नतीसाठी सुद्धा कार्य केले.

आधुनिक शिक्षणाला गती देण्याचे काम केले आणि ब्रिटिशांच्या धोरणांपासून भारतीय समाजाला जागृत करण्यासाठी, त्यांनी प्रशिक्षण दिले. या कालखंडात सती प्रथा मानली जात होती, त्यांनी समाजाला सांगितले की, सती प्रथेचा उल्लेख वेदांमध्ये, उपनिषद यामध्ये कोठे केले नाही.

त्यांनी समाजाला आव्हान केले की, सती प्रथा माणुसकीचे तत्त्वांपासून वेगळी आहे आणि तितकीच क्रूर ही आहे. त्याला समाजाने कायमचे नष्ट करणे गरजेचे आहे.

यासाठी मोहन रॉय यांनी ब्रिटिश सरकारला काही प्रस्तावही पाठवले, यामध्ये त्यांनी सती प्रथेला पाठिंबा देणारा फौजदारी गुन्हा दाखल केला जावा, अशी मागणी केली.

पुढे ब्रिटिश सरकारने ही १८२९ साली सती प्रथेला बंद करण्यासाठी, कायदेशीर पाऊल  उचलले. त्या काळात गव्हर्नर जनरल होते, विल्यम पेंटिंग. सती प्रथा बंद करणे ही यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्धी होती.

रॉय यांनी बहुपत्नी परंपरेला  सुद्धा विरोध केला. विधवांसोबत समाजात होत असलेल्या अन्याय विरुद्ध त्यांनी कार्य केले. त्यांनी स्त्री पुरुष समानतेसाठी, समाजात जागृती कार्यक्रम घेतले.

संपत्तीवर मुलांप्रमाणे मुलींचाही तितकाच अधिकार असायला हवा, असे यांचे मत होते.

Raja Ram Mohan Roy

यानंतर त्यांनी आधुनिक शिक्षणाला, भारतीय समाजात गती देण्यासाठी, डेव्हिड हेयर यांच्या कार्याला पाठिंबा दर्शवला. त्याचबरोबर १८१७ साली हिंदू कॉलेजची सुरुवात झाली. राजाराम मोहन राय स्वतः इंग्लिश स्कूल चालवत होते, ज्यामध्ये विज्ञान आणि वेस्टर्न शिक्षण प्रणाली शिकवली जात होती.

पुढे जाऊन १८२५ साली  विधानसभेची स्थापना झाली ज्यामध्ये भारतीय तसेच वेस्टर्न भाषांमध्ये शिक्षण देण्यास सुरुवात झाली. राजाराम मोहन रॉय यांनी भारतीय समाजाला ब्रिटिशांच्या धोरणांबद्दल जागृत बनवले.

ते स्वतः जर्नलिस्ट होते. याच बरोबर राजाराम मोहन रॉय यांना अनेक भाषा अवगत होत्या. ज्यामध्ये बंगाली, ग्रीक, इंग्लिश, लॅटिन, भाषा यांचा समावेश होता. राजा राममोहन रॉय यांनी आपले साहित्य हिंदी, इंग्लिश, बंगाली आणि पर्शियन भाषेत लिहिले होते.

याच साहित्याच्या माध्यमातून, भारतीय समाजाला त्यांनी ब्रिटिशांच्या राजकारणा पासून जागृत केले. यामधून त्यांनी जमीनदार, जमीन महसूल कायद्याने कशाप्रकारे शेतकऱ्यांचे शोषण करत आहेत, त्याच्याबद्दल समाजात जागृती निर्माण केली.

रॉय यांनी निर्यात करणाऱ्या उत्पादनावर लागणारा जो निर्यात शुल्क आहे, त्याच्या बद्दल सरकारकडे मागण्या केल्या. भारतीय प्रशासकीय सेवेचे भारतीय कर्मवीर यासाठी हालचाली सुरू केला.

कार्यकारी प्रशासन आणि न्याय व्यवस्था एकमेकांपासून विभक्त केली पाहिजे, अशा मागण्या त्यांनी ब्रिटिश सरकार पुढे मांडल्या. पुढे याच मागणीला राष्ट्रीय काँग्रेसने सुद्धा ब्रिटिश सरकार समोर ठेवले.

राजाराम मोहन रॉय यांचे प्रारंभिक जीवन

राजाराम मोहन रॉय यांचा जन्म दि. २२ मे १७७२ ला बंगाल मधील हुबळी जिल्ह्यात राधानगरी या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रमाकांत रॉय तर आईचे नाव तारिणी देवी होते.

Raja Ram Mohan Roy

त्यांचे पंजोबा कृष्णचंद्र बॅनर्जी हे बंगालच्या नावाबाच्या ठिकाणी नोकरीस होते. त्यामुळे त्यांना रॉय ही पदवी मिळाली होती आणि तेच नाव आडनावा मध्ये त्यांनी वापरायला सुरुवात केली.

राजा राममोहन रॉय यांनी विविध भाषेमध्ये शिक्षण घेतले होते. जसे अरेबिक, पर्शियन, तसेच संस्कृत यामध्ये त्यांनी वेद, उपनिषदे, बौद्ध धर्माचा अभ्यास केला होता. राजा राम मोहन रॉय यांनी ईस्ट इंडिया कंपनीमध्ये नोकरी केली.

ते १८०५ ला महसूल अधिकारी जॉन डिग्री यांचे सहाय्यक म्हणून त्यांनी काम केले. नंतर त्यांनी दिवाण म्हणून काम पाहिले. राजा राममोहन रॉय यांना राजाही पदवी मुगल सम्राट अकबर दुसरा यांनी बहाल केली. असाधारण कार्यामुळे त्यांना आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखले जाते.

राजा राम मोहन रॉय यांचे धार्मिक कार्य

राजा राममोहन रॉय हे परंपरा वादी सनातन हिंदू कुटुंबातील होते. त्यांनी वेद आणि उपनिषदे याचबरोबर इस्लाम, ख्रिश्चन आणि बौद्ध धर्माचा अभ्यास केला आणि या सर्वांच्या अभ्यासातून त्यांनी एकेश्वर वादाचा पुरस्कार केला.

हिंदू धर्मात असलेल्या सनातन वादा कडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलला. त्यांनी कर्मकांड मूर्ती पूजा, पुरोहित वर्ग, यांच्यावर निर्भीडपणे टीका करायला सुरुवात केली. हिंदू धर्मातील जुन्या धर्मग्रंथावर त्यांनी विश्वास दाखवला.

राजा राम मोहन रॉय

वडिलांबरोबर होत असलेल्या विचारांच्या मतभेदामुळे, त्यांना घर देखील सोडावे लागले. हिंदू धर्मात सुधारणा करण्या करता त्यांनी आत्मीय सभा यां समुदाय यासारख्या संस्था चालू केल्या. पुढे त्यांनी ब्राम्हो समाजाची स्थापना केली.

राजाराम मोहन रॉय हे स्त्री पुरुष समानता याचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या विचारांना पाठिंबा देणाऱ्या लोकांना एकत्र करून, त्यांनी आत्मीय सभेची स्थापना केली. त्याला सोसायटी ऑफ फ्रेंड्स असेही म्हणत. या संस्थेची स्थापना त्यांनी १८१५ मध्ये केली.

२० आगस्ट १८२८ मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना त्यांनी केली. ती पुढे चालून २३ जानेवारी १८३० ला प्रार्थना स्थळाचे उद्घाटन करून, त्यांना ब्राह्मण समाज हे नाव देण्यात आले. यामध्ये भाद्रोस्तव आणि माघोत्सोव हे दोन महत्त्वाचे सण ब्राह्मण समाज साजरी करत.

एकेश्वर वादाचा पुरस्कार करण्यासाठी १८०९ मध्ये त्यांनी एकेश्वर वादाची देणगी हे पर्शियन भाषेत पुस्तक लिहिले. असे विविध स्तरावर त्यांनी धार्मिक कार्यात मोलाचे योगदान केले.

राजा राम मोहन रॉय यांचे सामाजिक कार्य

राजाराम मोहन रॉय यांच्या काळात, अनेक अनिष्ट रूढी आणि परंपरा यांनी भारतीय समाज ग्रासलेला होता. जातीभेद, सती प्रथा, बालविवाह, बहुविवाह, विधवा विवाहस मनाई, हुंडा पद्धती, अशे अनेक प्रकार त्याकाळी होते.

त्यांनी आपल्या कार्यातून या प्रकारचे निर्मूलन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना काही अंशी यामध्ये यशही आले. जसे सती प्रथेला विरोध हा त्यांचा पहिल्यापासून होता. राजाराम मोहन रॉय यांचे मोठे भाऊ जग मोहन यांचे १८१८ ला निधन झाले.

त्यावेळी त्यांची वहिनी अलख मंजिरी या सती गेल्या. या घटनेमुळे त्यांच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला. सती प्रथा कशी चुकीची आहे, हे त्यांनी विल्यम यांना पटवून दिले आणि १८२९ मध्ये सती बंदी कायदा लागू करण्यात आला. यात राजा राममोहन रॉय यांचे मोलाचे योगदान होते.

तसेच त्यांनी जातीभेद, अस्पृश्यता या प्रथांनाही विरोध केला. त्यांनी आंतर जातीय विवाह, विधवा पुनर्विवाह, यांना पाठिंबा दिला. शेतकऱ्यांसाठी त्यांनी प्रयत्न केले.

त्यांनी शेतकऱ्यांची बाजू घेतली. मोठे जमीनदार, गरीब शेतकरी आणि कामगार यांची कशी पिळवणूक करतात, हे ब्रिटिश सरकारला पटवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या कुळाच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी, कायद्याची मागणी केली.

राजा राममोहन रॉय यांच्या काळात वृत्तपत्रे फक्त इंग्लिश भाषेत छापली जायची. परंतु राजाराम मोहन रॉय यांनी मिरतुल अकबर हे पार्शियन भाषेत वृत्तपत्र तर, संवाद कौमुदी हे बंगाली भाषेतील साप्ताहिक चालू केले.

बातमी छापण्यासाठी जी ब्रिटिश सरकारची परवानगी लागत होती, त्यामुळे त्यांनी याचिका दाखल करून वृत्तपत्राच्या स्वातंत्र्याची मागणी ब्रिटिश सरकारकडे केली. याचा परिणाम म्हणून या गव्हर्नर जनरलने १८३५ मध्ये वृत्तपत्रावरील बंधने काढून टाकली.

राजा राम मोहन रॉय यांचे निधन

अनेक क्षेत्रांमध्ये त्यांचे असलेले मोलाचे योगदान, यामुळे त्यांना आधुनिक भारताचे जनक ही उपाधी इतिहासात मिळाली.

अशा या महान समाज सुधारक राजाराम मोहन रॉय यांचा मृत्यू २७ सप्टेंबर १८३३ मध्ये इंग्लंड मधील ब्रिस्टॉल या ठिकाणी आजारपणामुळे झाला. राजा राम मोहन रॉय यांनी आपला जन्म भारतीय समाजाच्या सुधारण्यासाठी अर्पण केला.

राजा राम मोहन रॉय यांच्याबद्दल मनोरंजक तथ्ये

  • राजा राम मोहन रॉय यांनी १८१७ मध्ये हिंदू कॉलेजची स्थापना केली आणि याला त्यांच्या मित्रांनी सपोर्ट केला त्यांचे नाव होते डेव्हिड हेयर आणि अलेक्झांडर.
  • तसेच त्यांनी १८१७ मध्ये इंग्लिश स्कूलची कलकत्त्यामध्ये स्थापना केली.
  • राजा राम मोहन रॉय यांनी वेद आणि उपनिषदे बंगाली भाषेमध्ये भाषांतरीत केली केली.
  • लॉर्ड बेंटिक प्लॅन म्हणजेच मेकाले प्लान ऑफ एज्युकेशन याला त्यांनी सपोर्ट दर्शवला.
  • १८०३ मध्ये त्यांनी पॉप्युलर पुस्तक हे एकेश्वर वादाचा पुरस्कार करण्या करिता हे पुस्तक प्रकाशित केले.
  • १८१५ मध्ये त्यांनी आत्मीय सभेची स्थापना केली, तसेच १८१६ मध्ये त्यांनी वेदांत सोसायटीची स्थापना केली.
  • वेदांत स्कूल १८२० मध्ये राजा राम मोहन रॉय यांनी चालू केले.
  • १८२८ मध्ये त्यांनी ब्राह्मो सभेची स्थापना केली.
  • १८३० मध्ये त्यांनी ब्राह्मो समाज हे त्याला नाव दिले.
  • १८२० मध्ये द प्रेसेंट ऑफ जीसस, हे बुक त्यांनी मॉरल प्रिन्सिपल ऑफ ख्रिश्चनटीला पुरस्कार करण्यासाठी लिहिले.
  • ब्राह्मो समाजाची पोकलेरिटी फर्स्ट सेक्रेटरी ताराचंद चक्रवर्तीच्या काळामध्ये शिगेला पोहोचली
  • राजा राम मोहन रॉय यांचा मृत्यू इंग्लंडमध्ये १८३३ मध्ये ब्रिस्टॉल या शहरांमध्ये झाला.

राजा राम मोहन रॉय यांच्या बद्दल थोडक्यात माहिती

१९ व्या शतकात म्हणजे १८०१ ते १९०० च्या कालखंडा दरम्यान भारतातील समाज अस्थिरपणे चालला होता, समाजात गोंधळाचे वातावरण होते, यावर केशव चंद्रसेन यांनी वक्तव्य केला आहे. ते म्हणतात, आज जो देश आपण बघत आहे, तो पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करून, आपली संस्कृती विसरून गेला आहे.

भारतीय संस्कृती जगातील एक महान संस्कृती आहे. तर एकेकाळी महान संस्कृती असणारा हा देश आता गुलामगिरीत का अडकलेला आहे ? आपल्याला असा प्रश्न पडतो, तर त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यावरचे लोक निरीक्षण होते.

हे लोक जात, धर्म, कर्मकांडात अडकून पडलेले होते. भारतातील समाज मोठ्या प्रमाणात धार्मिक प्रवृत्तीचा समाज होता. या समाजाला इतर गोष्टींची कोणतीही समज नव्हती. त्यात पंडित वर्ग पूर्णपणे भ्रष्टाचारी होता. सामान्य जनतेला लुटणारा होता.

या कालखंडात जनतेचे मोठ्या प्रमाणावर शोषण केले. हे लोक सामान्य जनतेला आदेश द्यायचे, ते आदेश सर्वसामान्य जनता डोळे झाकून, स्वीकाराची. या समाजाने, आपण हे का करत आहोत ? याचा कधीही विचार केला नाही आणि याच प्रथा, परंपरामुळे समाज अंधश्रद्धेचा बळी झाला.

भारतीय समाजात असणाऱ्या अशा काही वर्गांमुळे, भारतीय समाज आधुनिकीकरणाच्या विरुद्ध दिशेने आपली पावले उचलत होता. या समाजातील स्त्रियांचा दर्जा खालावत गेला, जनता अस्पृश्यता पाळू लागली आणि यामुळे जातीभेद समाजामध्ये वाढत गेला.

आता देशाला एका समाज सुधारकाची गरज होती आणि सुधारणा जर अपेक्षित आहे, तर सामान्य जनतेने त्याप्रमाणे विचार करण्याला सुरुवात करायला हवी आणि यालाच भारतातील समाज सुधारणा असे म्हटले जाते. भारतातील समाज सुधारणा म्हटल्यानंतर, आपल्यासमोर एकच नाव समोर येते ते म्हणजे, भारतीय समाज सुधारक राजाराम मोहन रॉय.

एक छोट्या परिवारात जन्माला आले. यांना दुसऱ्या अकबर सम्राटनी राजाही पदवी दिली होती. भारतातील समाजाला अंधश्रद्धा आणि जाति भेदापासून लांब नेण्याचा आणि देशातील समाजाचा सर्वांगीण विकास करण्याचा, राजा राम मोहन रॉय यांचा उद्देश होता आणि हे काही लहान काम नव्हतं.

त्या काळातील एक आव्हानात्मक काम म्हणजे, समाज सुधारणा करणे, म्हणून राजाराम मोहन रॉय यांनी पाश्चिमात्यांचे आधुनिकीकरण आणि भारतीय संस्कृतीची सांगड घालून, आपलं काम सुरू केलं.

राजाराम मोहन रॉय म्हणायचे की, भारतीय समाजाने पाश्चिमात्यांचे अनुकरण केले पाहिजे. यामुळे भारतीय संस्कृती आणि परंपरा सुधारले जातील आणि कार्यप्रणाली बौद्धिक आणि कार्याधरत असली पाहिजे.

पाश्चिमात्यांचे अनुकरण करायच्या अगोदर, भारतीय समाजाने आपल्या परीने समाजातील अनिष्ट प्रथा नष्ट करून, समाजात सुधारणा करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. राजा राम मोहन रॉय यांनी भारतीय समाजासाठी जे कार्य केलं, भारतीय समाजात बदल घडवून आणले.

FAQ

१. राजा राम मोहन रॉय यांचा मृत्यू का झाला?

या महान समाज सुधारक राजाराम मोहन रॉय यांचा मृत्यू २७ सप्टेंबर १८३३ मध्ये इंग्लंड मधील ब्रिस्टॉल या ठिकाणी आजारपणामुळे झाला. राजा राम मोहन रॉय यांनी आपला जन्म भारतीय समाजाच्या सुधारण्यासाठी अर्पण केला.

२. राजा राम मोहन रॉय कोण होते त्यांच्याबद्दल लिहा?

राजा राम मोहन रॉय एकेश्वर वादाला पाठिंबा देणारी व्यक्ती होते. याचा अर्थ म्हणजे सर्व धर्म जाती जरी वेगवेगळ्या असल्या तरी, ईश्वर एकच आहे आणि सर्वधर्म, जात, पंथ, एकाच ईश्वरीची पूजा करतात. सध्या जरी आपण आपल्या समाजात बघितले, तर आपल्या लक्षात येते की, भारतात अजूनही जातीभेद पाळला जातो. त्यामुळे राजा राम मोहन रॉय यांनी प्रथम समाजापर्यंत एक गोष्ट पोचली ती म्हणजे ईश्वर एक आहे आणि आपण एकाच ईश्वरची पूजा केली पाहिजे. यावर १८०९  साली त्यांनी एक ग्रंथ लिहिला, या पुस्तकात त्यांनी सांगितले आहे की, आपल्याला आपल्या सर्व अपेक्षा आणि सर्व संकल्पना, एका ईश्वराकडे वळवल्या पाहिजेत. हे पुस्तक त्यांनी पर्शियन भाषेत लिहिले आहे.

३. राजा राममोहन रॉय यांचे मूळ नाव काय होते?

राजाराम मोहन रॉय यांचा जन्म दि. २२ मे १७७२ ला बंगाल मधील हुबळी जिल्ह्यात राधानगरी या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रमाकांत रॉय तर आईचे नाव तारिणी देवी होते. त्यांचे पंजोबा कृष्णचंद्र बॅनर्जी हे बंगालच्या नावाबाच्या ठिकाणी नोकरीस होते. त्यामुळे त्यांना रॉय ही पदवी मिळाली होती आणि तेच नाव आडनावा मध्ये त्यांनी वापरायला सुरुवात केली.

४. सती प्रथा कधी आणि कोणी संपवली?

राम मोहन रॉय यांचे मोठे भाऊ जग मोहन यांचे १८१८ ला निधन झाले. त्यावेळी त्यांची वहिनी अलख मंजिरी या सती गेल्या. या घटनेमुळे त्यांच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला. सती प्रथा कशी चुकीची आहे, हे त्यांनी विल्यम यांना पटवून दिले आणि १८२९ मध्ये सती बंदी कायदा लागू करण्यात आला. यात राजा राम मोहन रॉय यांचे मोलाचे योगदान होते.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास राजा राम मोहन रॉय यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment