सायना नेहवाल ही भारतीय महिला बॅडमिंटनपटू असून, बऱ्याच कालावधी पर्यंत सायना ही जगातील एक नंबर बॅडमिंटनपटू म्हणून ओळखली जाते. सायनाच्या बॅडमिंटन खेळामुळेच तिला संपूर्ण जगामध्ये प्रसिद्धी प्राप्ती झाली.
सायनाने २००४ पासून बॅडमिंटन मध्ये आपले करिअर करण्यास सुरुवात केले. ज्यादरम्याने तिला विविध पदके, पुरस्कार, यश व सन्मान प्राप्त झाला.
२००९ पर्यंत सायना नेहवाल ही टॉप १० बॅडमिंटनपटूंच्या क्रमयादीमध्ये येत होती. २०१५ मध्ये सायना जागतिक क्रमवारीमध्ये प्रथम क्रमांकावर झळकली. या क्रमवारीवर झळकणारी नेहवाल ही पहिलीच भारतीय महिला होती.
नेहवालने भारतासाठी तीन वेळा ऑलिंपिक स्पर्धा खेळली. सायनाच्या या कामगिरीचे कौतुक जितके करावे तितके कमीच आहे. तिने प्रत्येक बॅडमिंटन खेळात यश संपादन केले. ज्यामध्ये तिला तिच्या कुटुंबाचा सपोर्ट वेळोवेळी लाभला.
सायनाने कुटुंबा समवेत भारताचे नाव संपूर्ण जगामध्ये गौरविले. सायना ही यशस्वी बॅडमिंटनपटूपैकी एक म्हणून ओळखली जाते. जिला भारतातील बॅडमिंटनची लोकप्रियता वाढवण्याचे श्रेय दिले गेले आहे.
आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास सायना नेहवाल हिच्याबद्दल माहिती दिलेली आहे. हा लेख जाणून घेण्यासाठी शेवट पर्यंत नक्की वाचा.
सायना नेहवाल माहिती मराठी Saina Nehwal Information In Marathi
पूर्ण नाव | सायना नेहवाल |
जन्म तारीख | दि. १७ मार्च १९९० |
जन्म स्थळ | हिसार, हरियाणा |
वडिलांचे नाव | हरवीर सिंग |
आईचे नाव | उषा राणी |
व्यवसाय | खेळाडू |
खेळ | आंतरराष्ट्रीय महिला बॅडमिंटनपटू |
प्रशिक्षक | विमल कुमार |
हस्त कौशल्य | उजवा हात |
सर्वोच्च रँकिंग | १ (एप्रिल 2, २०१५) |
वर्तमान रँकिंग | ५ (जून ३०, २०१६) |
सायना नेहवाल जन्म, शिक्षण व कौटुंबिक माहिती
सायना हिचा जन्म हरियाणा राज्यातील हिसार येथे दिनांक १७ मार्च १९९० मध्ये झाला. नेहवालची आई उषा राणी या हरियाणा राज्यातील बॅडमिंटन खेळाच्या राज्यस्तरीय खेळाडू होत्या.
हे वाचा –
- सचिन तेंडुलकर माहिती मराठी
- मेजर ध्यानचंद माहिती मराठी
- कपिल देव माहिती मराठी
- विराट कोहली माहिती मराठी
- पी टी उषा यांची माहिती
- सानिया मिर्झा माहिती
सायना यांना चंद्रशेह नावाची मोठी बहीण असून, चंद्रशेह व्हॉलीबॉल खेळाडू आहे. सायना हिचे वडील डॉक्टर हरवीर सिंह नेहवाल हे कृषी क्षेत्रात असून, ते हरियाणा कृषी विद्यापीठामध्ये कार्यरत आहे.
सायनाचे प्राथमिक शिक्षण हरियाणा राज्यातील हिसार येथे पूर्ण झाले, तर बारावीचे शिक्षण सेंड अँड कॉलेज वुमन हैदराबाद या ठिकाणहून सायनाने पूर्ण केले.
सायनाची आई बॅडमिंटन खेळाडू असल्याने व राष्ट्रीय पातळीवर बॅडमिंटन खेळाडू बनण्याचे आईचे स्वप्न अपूर्ण राहिल्याने सायना नेहवाल हिने बॅडमिंटन खेळात करिअर करायचे व राष्ट्रीय पातळीवर बॅडमिंटन खेळण्याचे ठरवले.
त्या दृष्टीने सायना हिच्या वडिलांनी सायनाला भरपूर पाठिंबा दिला. वडिलांनी स्वतःच्या भविष्याच्या निर्वाह निधीतील रक्कम काढून, सायनाला बॅडमिंटनचे उत्कृष्ट प्रशिक्षण दिले. नेहवालचे वडील हे विद्यापीठामध्ये चांगले खेळाडू होते.
सायना नेहवालचा प्रारंभिक काळ
सायनाचा जन्म हरियाणा मधील हिस्सार या ठिकाणी एका जाट कुटुंबामध्ये झाला. सायनाचे वडील हरवीर सिंग हे कृषी विद्यापीठामध्ये कार्यरत होते, तर तिची आई उषा राणी ही राज्यस्तरीय बॅडमिंटनपटू होती.
वडिलांच्या नोकरीमुळे काही कालावधीने वडिलांना हरियाणा मधून हैदराबाद मध्ये स्थलांतर करावे लागले, यामुळे सायनाचे प्रारंभिक शालेय शिक्षण हरियाणा मधूनच पूर्ण झाले. परंतु वडिलांच्या नोकरीमुळे सायनाला अनेक वेळा तिची शाळा बदलून शिक्षण घ्यावे लागले.
सायनाने सेंड कॉलेज, मेहदीपट्टणम, हैदराबाद या ठिकाणी बारावी पूर्ण केली. सायनचा स्वभाव अत्यंत निरागस, लाजाळू, शांत होता. ती अभ्यासात अतिशय हुशार होती. अभ्यासाबरोबरच सायनाला कराटे शिकायला फार आवडे. सायनाला कराटे मध्ये ब्राऊन बेल्ट मिळाला आहे.
सायना नेहवाल आवडी निवडी
आवडता अभिनेता | शाहरुख खान आणि महेश बाबू |
आवडते ठिकाण | सिंगापूर |
आवडता खेळाडू | सचिन तेंडुलकर (क्रिकेटर) आणि रॉजर फेडरर (टेनिस खेळाडू) |
आवडता खाद्यपदार्थ | आलू पराठा आणि किवी |
छंद | फिरणे |
सायनाची बॅडमिंटन खेळाकडे ओढ
सायनाच्या घरामध्ये असलेल्या खेळीच्या वातावरणामध्ये, आई-वडिलांकडून सायनाला बॅडमिंटन खेळाची ओढ वाटू लागली व सायनाने बॅडमिंटन मध्ये करिअर करण्याचे ठरविले.
वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षी सायनाच्या वडिलांनी सायनाला बॅडमिंटन शिकवण्याचा निर्णय घेतला, त्यासाठी त्यांनी तिला हैदराबादच्या लाल बहादूर स्टेडियम मध्ये प्रशिक्षणासाठी घेऊन जाण्याचे ठरवले.
ज्या ठिकाणी सायनाचे प्रशिक्षक नानी प्रसाद यांच्याकडून सायनाने प्रथम बॅडमिंटन शिकायला सुरुवात केली. नानी प्रसाद हे प्रशिक्षणाच्या बाबतीत अतिशय कठोर होते, ज्यांनी सायनाला उत्तम फिटनेस बाबत युक्त्या शिकवल्या.
नेहवालच्या वडिलांनी आपल्या मुलीला उत्तम बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेता यावे, यासाठी आपल्या बचत खर्चातील पैसे सायनाच्या प्रशिक्षणासाठी खर्च केलेत.
सायना नेहवालचे स्टेडियम तिच्या घरापासून साधारणतः २५ किलोमीटर अंतरावर असायचे, त्यामुळे सायनाच्या वडिलांनी सायनाचे बॅडमिंटन प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेऊन, रोज पहाटे चार वाजता सायनाला ते स्टेडियम मध्ये सोडायला जायचे.
सायना स्टेडियम मध्ये २ तास सराव करून, नंतर शाळेमध्ये शिक्षण घेत असे, असा तिचा दिनक्रम चालू होता. काही कालावधीनंतर सायनाने द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित देशातील प्रसिद्ध खेळाडू एस.एम.आर.एफ यांच्याकडून बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.
त्यानंतर नेहवाल हिने हैदराबादच्या पुलेला गोपीचंद अकादमी मध्ये बॅडमिंटनच्या प्रशिक्षणासाठी दाखला घेतला, जिथे तिने गोपीचंदजी कडून प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. सायनाने गोपीचंदजी यांना आपले गुरु मानले होते.
सायना नेहवाल बद्दल वैयक्तिक तपशील
दिनांक १४ डिसेंबर २०१८ मध्ये नेहवालने पारूपल्ली कश्यपशी यासोबत विवाह केला. पारूपल्ली कश्यपशी हा देखील एक अनुभवी बॅडमिंटनपटू होता.
सायनाची ओळख पारूपल्लीशी पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकादमी मध्ये झाली. दोघेही बरेच काळ अतिशय चांगले मित्र होते, यानंतर पुढे जाऊन त्यांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.
सायना नेहवाल शारीरिक ठेवण
वजन | 65 किलो |
उंची | ५ फूट ६ इंच |
शरीराचे मापन | ३४ – २६ – ३४ |
केसांचा रंग | काळा |
डोळ्यांचा रंग | तपकिरी |
सायना नेहवाल ची बॅडमिंटन मधील कारकीर्द
२००३
सायनाने २००३ च्या दरम्याने ज्युनियर चेक ओपन मध्ये तिची पहिली बॅडमिंटन स्पर्धा खेळली, त्यामध्ये तिने जिंकून एक उल्लेखनीय कामगिरी केली.
२००४
२००४ च्या दरम्याने झालेल्या कॉमनवेल्थ युथ गेम्स मध्ये सायनाने बॅडमिंटन मध्ये दुसरा क्रमांक पटकावला, यानंतर सायनाची बॅडमिंटन खेळातील आवड व कामगिरी ही यश गाठतच गेली.
२००५
२००५ च्या दरम्याने सायनाने पुन्हा आशियाई सॅटॅलाइट बॅडमिंटन स्पर्धा जिंकली. आशियाई सॅटेलाईट सॅटेलाईट बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सतत दोन वेळा जिंकून सायनाने मोठे विजेतेपद पटकावले त्यावेळी सायनाचे वय हे १९ वर्षाखाली होते, जी सर्वात पहिली तरुण बॅडमिंटन खेळाडू ठरली.
२००६
मे २००६ च्या दरम्याने सायनाने ४ स्टार टूर्नामेंट फिलिपिन्स ओपन मध्ये सक्रिय सहभाग दर्शवला. त्यावेळी सायनाचे वय हे अवघे १६ वर्ष होते. सायनाने या स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावले, हे विजेतेपद पटकवणारी भारत व आशियामधील नेहवाल ही पहिली महिला खेळाडू ठरली. याचवर्षी सायनाने पुन्हा एकदा सॅटॅलाइट स्पर्धा जिंकून भारताचा मान उंचावला.
२००८
२००८ मध्ये सायनाने जागतिक ज्युनिअर बॅडमिंटन चॅम्पियनशिप ही स्पर्धा जिंकणारी, पहिली भारतीय महिला ठरली. त्याच वर्षी सायनाने चायनीज टीपी ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड, इंडियन नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप तसेच कॉमनवेल्थ गेम्स या स्पर्धा सुद्धा जिंकून, विजेतेपद स्वतःच्या नावे केले. २००८ मध्ये सायनाला सर्वात आश्वासक खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले होते.
२००९
२००९ मध्ये जगातील सर्वात प्रमुख बॅडमिंटन मालिका इंडोनेशिया ओपन जिंकणारी सायना नेहवाल ही भारतीय पहिली महिला खेळाडू ठरली. सायनाच्या या खेळीमुळे सायनाला अर्जुन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
२०१०
२०१० च्या दरम्याने इंडिया ओपन ग्रंड प्रिक्स गोल्ड, सिंगापूर ओपन सुपर सिरीज, इंडोनेशिया ओपन सुपर सिरीज, हॉंगकॉंग सुपर सिरीज, सायनाने स्वतःच्या नावे केली. २०१० च्या दरम्यान सायनाने दिल्लीतील कॉमनवेल्थ गेम्स मध्ये सर्वात मोठा विजयाचा झेंडा रोवला. ज्या ठिकाणी सायनाने बॅडमिंटन एकेरीतील मलेशियाच्या खेळाडूला अगदी मोठ्या पराभवाने पराभूत करून सुवर्णपदक स्वतःच्या नावे केले.
२०११
स्विस ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड जिंकणारी सायना नेहवाल ही २०११ मधील पहिली भारतीय महिला ठरली. याशिवाय सायनाने मलेशिया ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड, इंडोनेशिया ओपन सुपर सीरिज प्रीमियम आणि बीडब्ल्यूएफ सुपर सिरीज मास्टर फायनल मध्ये सायनाने दुसरे स्थान पटकावले.
२०१२
२०१२ दरम्यान सायना नेहवालने स्विस ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड, थायलंड ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड व इंडोनेशिया ओपन सुपर सिरीज प्रीमियम जिंकले.
यासोबतच सायनाने तिसऱ्यांदा इंडोनेशिया ओपनचे विजेतेपद पटकावले. २०१२ चा लंडन ऑलम्पिक मध्ये नेहवालने पहिलांदा ऑलम्पिक मध्ये कांस्यपदक प्राप्त केले. याबरोबरच ऑलिंपिक स्पर्धेत बॅडमिंटन मध्ये कांस्य पदक प्राप्त करणारी सायना नेहवाल ही पहिली भारतीय महिला ठरली.
या प्रचंड विजयानंतर नेहवाल हिच्यावर पुरस्कार व सन्मानाचा वर्षाव करण्यात आला. राजस्थान, आंध्र प्रदेश, हरियाणा सरकारने सायनाला रोख रक्कम देण्यास जाहीर केले. याबरोबरच क्रीडामंत्र्यांनी सायनाला आयएएस अधिकाऱ्यांच्या बरोबरीची नोकरी सुद्धा ऑफर केली.
२०१४
२०१४ मध्ये सायना हिने भारताच्या जागतिक चॅम्पियनशिप पी.व्हीं सिंधू हीचा पराभव केला. याच वर्षी सायना नेहवाल चायना ओपन सुपर सिरीज प्रीमियम जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली.
२०१५
२०१५ मध्ये सायना नेहवालने पुनश्च एकदा इंडिया ओपन ग्रांपी गोल्ड स्वतःच्या नावे केले. यानंतर सायनाने ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीमध्ये उत्कृष्ट खेळी दाखवत, या स्पर्धेमध्ये भारतीय महिला एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोहोचण्याची ही प्रथमच वेळ होती. परंतु दुर्दैवाने सायनाला हा खेळ जिंकता आला नाही.
त्यानंतर दिनांक २९ मार्च २०१५ मध्ये सायनाने इंडिया ओपन बीडब्ल्यूएफ सुपर सीरीज द्वारे महिला एकेरी विजेते पद प्राप्त केले. यानंतर दिनांक २ एप्रिल रोजी बीडब्ल्यूएफ क्रमवारीनुसार सायना ही जगातील नंबर वन बॅडमिंटनपट्टू असण्याचा मान सायनाला मिळाला.
याच वर्षी अर्थ २०१५ च्या दरम्याने ऑगस्टमध्ये जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप मध्ये सायना नेहवालला कॅरोलिनाने अंतिम फेरीमध्ये पराभूत केले होते. यामुळे सायनाला रौप्य पदकावरतीच समाधान मानावे लागले होते.
२०१६
२०१६ हे वर्ष सायनासाठी थोडे संघर्षमय कालावधी होता. या वर्षात सायनाला अनेक प्रकारच्या दुखापती ग्रासल्या होत्या. परंतु सायनाने हार न मानता स्वतःची तब्येत लवकर बरी करत, आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक प्राप्त केले. २०१० नंतर जिंकलेल्या आशिया चॅम्पियनशिप नंतरची ही दुसरी घटना नोंदवली गेली.
२०१६ च्या दरम्याने इंडोनेशिया ओपन सुपर सिरीज प्रीमियमच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये धडक मारली. यानंतर तिला पुन्हा एकदा कॅरोलिना कडून पराभवाला सामोरे जावे लागले. कॅरोलिना हि स्पॅनिश खेळाडू असून, जिने रिओ ओलंपिक मध्ये पी.व्ही सिंधूचा पराभव करून सुवर्णपदक प्राप्त केले होते.
२०१७
२०१६-१७ च्या दरम्याने नेहवाल हिच्या दुखापतीमुळे, सायना विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकली नाही. काही कालावधीने दुखापती बरा झाल्यानंतर, सायनाने गेम मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केला. यानंतर सायनाने पहिल्या मलेशिया ओपन ग्रांपीमध्ये भाग दर्शवून, ती स्पर्धा जिंकली.
यावर्षी ऑगस्टमध्ये सायनाने ग्लासगो येथे होणाऱ्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी तिला प्राप्त झाले. या स्पर्धेत सायनाने उपांत्यपूर्व फेरीमध्ये पराभव करून, उपांत फेरीमध्ये यशाचा झेंडा रोवला.
परंतु उपांत्य फेरी मध्ये तिला जपानच्या नोझमी ओकूहारांकडून पराभव पत्करावा लागला, त्यामुळे तिला कांस्य पदकावरती समाधान मानावे लागले.
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सायना नेहवालचे हे सलग दुसऱ्यांदा कांस्यपदक होते आणि तिने सलग सात वेळा उपांत्यपूर्व फेरीमध्ये धडक मारली होती.यानंतर नेहवालने पी.व्ही सिंधूला पराभूत करून ८२ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा जिंकून स्वतःचे नाव उंचावले होते.
२०१८
२०१८ मध्ये सायनाने उत्कृष्टरित्या कमबॅक केले. यावर्षी सायनाने इंडोनेशिया मास्टरच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. अंतिम फेरीत प्रवेश करणार साठी सायनाला उपांत्यपूर्व फेरीमध्ये चीनच्या चेन युफेई आणि झॉक्सिंग तसेच भारताच्या पी.व्ही सिंधूचा पराभव करावा लागला होता.
याच वर्षी सायनाने कॉमनवेल्थ गेम्सच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यांमध्ये पी.व्ही सिंधूचा पराभव करून सायनाचे दुसरे सुवर्णपदक तिने हासिल केले.
२०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सायनाने उल्लेखनीय कामगिरी केली. या खेळामध्ये सायनाने भारतासाठी आशियाई बॅडमिंटन पदक स्वतःच्या नावे जिंकून, भारताचे नाव उंचावले.
यामुळे सायनाला पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू हे पद प्राप्त झाले. कॉमनवेल्थ गेम्स, आशियाई चॅम्पियनशिप, एशियन गेम्स, वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑलम्पिक या पाच प्रतिष्ठित बॅडमिंटन स्पर्धांमध्ये पदके जिंकून सायनाने एक दुर्मिळ व उल्लेखनीय कामगिरी केली.
२०१९
२०१९ मध्ये नेहवालने उत्कृष्ट कामगिरी करत यावर्षी तिची पहिली स्पर्धा मलेशिया मास्टर यामध्ये तिने प्रवेश घेत, उत्तम कामगिरी केली. ज्या ठिकाणी तिने जपानच्या नोझोमी ओकुहराचा पराभव केला.
सायना नेहवाल पुरस्कार व सन्मान
- २००९ मध्ये सायनाला अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
- २०१६ मध्ये सायना नेहवाल हिला भारताचा तिसरा सर्वोच्च सन्मान पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आले.
- २००८ मध्ये सायनाला बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन तर्फे मोस्ट प्रॉमिसिंग प्लेयर ऑफ द इयरचा पुरस्कार देण्यात आला.
- २०१० मध्ये सायनाला भारतातील चौथा सर्वोच्च सन्मान पद्मश्री देऊन गौरवित करण्यात आले.
- २००९ ते २०१० च्या दरम्याने नेहवाल हिला सर्वात मोठा क्रीडा पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न देऊन गौरवीत करण्यात आले.
सायनाकडे आज संपूर्ण देशात व जगामध्ये एक प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन पट्टू या नावाने पाहिले जाते. सायनामुळेच आज भारतामध्ये बॅडमिंटन खेळ हा प्रसिद्ध झाला. सायनाकडून संपूर्ण युथ पिढीला प्रेरणा प्राप्त होते.
सायनाने बॅडमिंटन खेळाला एक नवी उंची प्रदान केली. बॅडमिंटनचा सचिन म्हणून सायना हिच्याकडे पाहिले जाते. सायना ही एक ऑलिम्पिक गोल्ड केस्ट द्वारे समर्पित खेळाडूंपैकी एक आहे.
कांस्यपदक जिंकल्यानंतर मिळालेले पुरस्कार
- राजस्थान सरकारकडून ५० लाखाची रोख रक्कम
- आंध्र प्रदेश सरकारकडून ५० लाखाची रोख रक्कम
- हरियाणा सरकारकडून १ कोटी रुपयांची रोख रक्कम
- मंगला येतं विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मान केला.
- बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया कडून १० लाखाची रोख रक्कम
सायना नेहवाल हीचे इतर उत्पन्न स्त्रोत
सायना हिला खेळाव्यतिरिक्त मॉडेलिंग च्या अनेक ऑफर्स येतात. ती अनेक कंपन्यांची ब्रँड अँबेसिडर सुद्धा आहे. सायना योनेक्स सहारा इंडिया परिवारची ब्रँड अँबेसिडर आहे.
याबरोबरच सायना टॉप रॅमन नूडल्स, फॉर्च्यून कुकिंग ऑइल, इंडियन ओव्हरसीज बँक, व्हॅसलीन, सहारा आणि योनेक्सच्या जाहिरातींमध्ये आपल्याला दिसून येते. यासोबतच सायना कॉमेडी नाईट विथ कपिल आणि द कपिल शर्मा शो, सत्यमेव जयते, यांसारख्या छोट्या पडद्याच्या रियालिटी शोमध्ये दिसून आलेली आहे.
सायना नेहवाल हिच्याबद्दल मनोरंजक तथ्ये
- सायना वुमन्स हेल्थ आणि सेमिना इत्यादी विविध मासिकांच्या कव्हर फोटोमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
- सायनाची आई उषा राणी सायनाला स्टेफी सायना या नावाने आवाज देते, कारण सायन आहे टेनिस स्टार स्टेफी ग्राफ ची मोठी फॅन आहे.
- २०१२ मध्ये सचिन तेंडुलकरने सायनाला ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्या, बद्दल बीएमडब्ल्यू कार भेट दिली होती.
- बॅडमिंटन खेळा व्यतिरिक्त सायनाला कराटे फार आवडतात, ती कराटे मध्ये ब्राऊन बेल्ट आहे.
- ऑक्टोंबर २०१६ मध्ये सायनाची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या ऍथलीट कमिशनची सदस्य म्हणून निवड झाली होती.
सायना नेहवाल बद्दल १० ओळी
- सायना एक आंतरराष्ट्रीय महिला बॅडमिंटनपटू आहे.
- सायनाचा जन्म दिनांक १७ मार्च १९९० मध्ये हिस्सार हरियाणा या ठिकाणी झाला.
- सायनाच्या आईचे नाव उषा राणी, ज्या हरियाणातील राज्यस्तरीय खेळाडू आहे. तर तिच्या वडिलांचे नाव डॉक्टर हरवीर सिंह असे आहे.
- जून २००९ मध्ये झालेल्या इंडोनेशियन खुल्या स्पर्धेमध्ये अजिंक्य पद पटकावणारी, सायना ही पहिलीच भारतीय महिला आहे.
- २०१२ साली स्विस ओपन स्पर्धा, थायलंड ओपन ग्रांपी सुवर्णपदक, लंडन ओलंपिक खेळात कांस्यपदक, सायना नेहवालने स्वतःच्या नावे केले आहे.
- ऑलिंपिक खेळात बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक जिंकणारी सायना ही पहिली भारतीय महिला आहे.
- चीन ओपन सुपर सिरीज जिंकणारी सायना पहिली भारतीय महिला ठरली आहे.
- नेहवालला खेळातील सर्वश्रेष्ठ राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले आहे.
- याचबरोबर नेहवालला अर्जुन पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार, इत्यादी, पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
- सायना भारताची फुलराणी म्हणून ओळखली जाते.
- सन २००६ मध्ये सायना १९ वर्षाखालील वयोगटातील सर्वोत्कृष्ट खेळाडू बनली. याच वर्षे सायनाने प्रतिष्ठेचा मानला जाणारा आशियाई उपग्रह बॅडमिंटन टूर्नामेंट जिंकून, नवा विक्रम प्रस्थापित केला. हा विक्रम करणारी सायना प्रथम भारतीय ठरली. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ओपन मधील 4 स्टार स्पर्धा जिंकून, ही स्पर्धा जिंकणारी प्रथम भारतीय महिला ठरण्याचा मान सायना नेहवाल हिलाच मिळाला. तसेच सायाना ही स्पर्धा जिंकणारी सर्वात तरुण आशियाई महिला होती.
- २००८ मध्ये जागतिक ज्युनिअर बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी प्रथम भारतीय महिला ठरण्याचा मान सुद्धा सायनाला मिळाला. ऑलिंपिक खेळामध्ये प्रथमतः क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचण्याचा महिला खेळाडूचा मान हा नेहवाल हिला जातो. सायना नेहवाल उत्कृष्ट खेळाडू मुळे तिला द प्रॉस्टिंझिंग प्लेयर असे नाव देण्यात आले. सायनाने २ एशिया ओपन स्पर्धा जिंकून, जगातील सर्वात प्रमुख बॅडमिंटन मालिका जिंकली.
- २०१० च्या उबेर कप क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत नेहवाल हिने भारतीय महिला संघाचे कॉर्डर फायनल टप्प्यात यशस्वी नेतृत्व केले. २०१० साली ऑल इंग्लंड सुपर सिरीजच्या उपांत फेरीमध्ये पोहचणारी सायना ही प्रथम भारतीय महिला ठरली. याच वर्षीच्या इंडियन ओपन ग्रांपी गोल्ड स्पर्धा जिंकून सायनाने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू असण्याची कामगिरी पार पाडली.
- २०१२ मध्ये स्विस ओपन थायलंड ओपन ग्रांपी स्पर्धेत विजेता होण्याच्या बहुमान सायनाला मिळाला. तसेच जागतिक स्तरावर मानाच्या समजल्या जाणाऱ्या व लंडन येथे आयोजित ऑलम्पिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून देणारी सायना नेहवाल होती.
- सायना हिला तिच्या उत्कृष्ट खेळासाठी भारत सरकारकडून २००९ मध्ये अर्जुन पुरस्कार तर २०१० मध्ये खेळातील अत्यंत मानाचा समजला जाणारा, राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार देऊन गौरवीत केले गेले.
- त्याचप्रमाणे सायना हिला २०१० मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन, गौरवीत केले गेले. तसेच २०१६ च्या दरम्याने पद्मभूषण पुरस्काराने सायना नेहवाल हिला सन्मानित करण्यात आले. आपल्या आईने पाहिलेले आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, सायना नेहवाल हिने अथक प्रयत्न केले, सायना निश्चितच आजच्या युथ पिढीसाठी अनुकरणीय व प्रेरणादायी आहेत.
FAQ
१. बॅडमिंटनमधील पहिली महिला विजेती कोण होती?
ऑलिंपिक खेळात बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक जिंकणारी सायना नेहवाल ही पहिली भारतीय महिला आहे.
२. सायना नेहवाल काय खेळते?
सायना नेहवाल ही भारतीय महिला बॅडमिंटनपटू असून, बऱ्याच कालावधी पर्यंत सायना ही जगातील एक नंबर बॅडमिंटनपटू म्हणून ओळखली जाते. सायनाच्या बॅडमिंटन खेळा मुळेच तिला संपूर्ण जगामध्ये प्रसिद्धी प्राप्ती झाली. सायनाने २००४ पासून बॅडमिंटन मध्ये आपले करिअर करण्यास सुरुवात केले. ज्यादरमाने तिला विविध पदके, पुरस्कार, यश व सन्मान प्राप्त झाला.
३. सायना नेहवालचा जन्म कधी आणि कुठे झाला?
सायना नेहवाल हिचा जन्म हरियाणा राज्यातील हिसार येथे दिनांक १७ मार्च १९९० मध्ये झाला.
४. सायना नेहवालच्या आई वडिलांचे नाव काय ?
सायना नेहवालची आई उषा राणी या हरियाणा राज्यातील बॅडमिंटन खेळाच्या राज्यस्तरीय खेळाडू होत्या. सायना नेहवाल यांना चंद्रशेह नावाची मोठी बहीण असून, चंद्रशेह व्हॉलीबॉल खेळाडू आहे. सायना नेहवाल हिचे वडील डॉक्टर हरवीर सिंह नेहवाल हे कृषी क्षेत्रात असून, ते हरियाणा कृषी विद्यापीठामध्ये कार्यरत आहे.
५. सायना नेहवालला कोणते पुरस्कार मिळाले आहेत ?
सायना नेहवालला खेळातील सर्वश्रेष्ठ राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले आहे. याचबरोबर सायना नेहवालला अर्जुन पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार, इत्यादी, पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
निष्कर्ष
मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास सायना नेहवाल हिच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.