संत तुलसीदास माहिती मराठी Sant Tulsidas Information In Marathi

तुलसीदास हे एक प्रसिद्ध कवी, साहित्यक व हिंदी साहित्यामधील महान तत्त्वज्ञ होते. तुलसीदासांनी स्वतःच्या संपूर्ण आयुष्यामध्ये, राम भक्ती करून अनेक प्रसिद्ध व महान ग्रंथांची रचना केली .तुलसीदास लिखित रामचरितमानस हा एक अति प्राचीन पौराणिक ग्रंथ फार प्रसिद्ध आहे.

ज्या ग्रंथास महाकाव्य म्हणून संबोधले जाते. रामचरितमानस व्यतिरिक्त तुलसीदास स्वामी यांनी वाल्मिकी ऋषी, दोहावली, संस्कृत रामायण, गीतावली, इत्यादी. कविता रचल्या. संत तुलसीदास हे प्रभू रामाचे महान भक्त व समर्थक होते.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास, संत महान तुलसीदास यांच्या बद्दल माहिती दिलेली आहे. हा लेख व ही माहिती जाणून घेण्यासाठी, शेवटपर्यंत लेख नक्की वाचा.

Table of Contents

संत तुलसीदास माहिती मराठी Sant Tulsidas Information In Marathi

पूर्ण नाव गोस्वामी संत तुलसीदास
जन्म तारीख इ.स. १५११
जन्म स्थळ सोरोन शुक्रक्षेत्र, कासगंज, उत्तर प्रदेश, भारत
टोपणनाव रामबोला
प्रसिद्धी गोस्वामी, अभिनववाल्मिकी
गुरुनरसिंह दास
तत्वज्ञानवैष्णव
प्रसिद्ध साहित्यकृतीरामचरितमानस, विनयपत्रिका, दोहावली, कवितावली, हनुमान चालीसा, वैराग्य सांदीपनी, जानकी मंगल, पार्वती मंगल, इ.
धर्महिंदू
तुलसीदास जी प्रसिद्ध दोहा श्रीराममय सब जग जानी ।
मी तुला युगाच्या पाण्याने नमन करतो.
(रामचरितमानस 1.8.2)
मृत्यूइ.स. १६२३ 
मृत्यूचे ठिकाणवाराणसी, उत्तर प्रदेश
वयमृत्यूच्या वेळी ११२ वर्षे

संत तुलसीदास यांचे प्रारंभिक जीवन

संत तुलसीदास म्हणजेच गोस्वामी तुलसीदास. यांचा जन्म उत्तर प्रदेशामधील, कासगंज या ठिकाणी सरयुपरिया या ब्राह्मण कुटुंबामध्ये, १५११ साली झाला.

हे वाचा –

मुघल शासक अकबर हा तुलसीदास यांचा समकालीन सम्राट म्हणून समजला जातो. तुलसीदास यांच्या वडिलांचे नाव, आत्माराम शुक्ल दुबे व आईचे नाव हुलसी दुबे असे होते. तुलसीदास यांच्या आई आध्यात्मिक होत्या.

Sant Tulsidas Information In Marathi

तुलसीदास यांच्या जन्माच्या बाबत एक अतिशय विलक्षण गोष्ट घडली, ती म्हणजे तुलसीदास यांच्या जन्माच्या वेळी बारा महिने तुलसीदास हे त्यांच्या आईच्या गर्भात होते. जेव्हा तुलसीदास यांचा जन्म झाला, तेव्हा ते अतिशय बलवान मुलाच्या रूपामध्ये बदलले व जन्मतः तुलसीदासांच्या तोंडामध्ये दात होते.

तुलसीदास जन्माला येताच राम राम असे नाव उच्चारत होते. त्यामुळे तुलसीदास यांचे बालपणीचे नाव रामबोला असे पडले.

संत तुलसीदास यांची कौटुंबिक माहिती

आईचे नावहुलसी दुबे
वडिलांचे नावआत्माराम शुक्ल दुबे
पत्नीचे नाव बुद्धमती (रत्नावली)
अपत्य मुलगा   – तारक
लहानपणीच मरण पावला

तुलसीदासजींचे शिक्षण

  • तुलसीदास यांनी त्यांचे प्रारंभिक शिक्षण त्यांचे गुरु नरसिंह दास यांच्या आश्रमामध्ये पूर्ण केले. तुलसीदासजी वयाच्या अवघ्या सात वर्षाचे असताना, त्यांचे पालक आत्माराम व आई तुलसी यांनी त्यांना प्राथमिक शिक्षणासाठी श्री अनंता आनंद जी यांचे प्रिय शिष्य श्री नरसिंह दास स्वामी यांच्या आश्रमामध्ये ठेवले.
  • नरसिंह दास यांच्या आश्रमामध्ये राहून, संत तुलसीदासांनी वयाच्या १४ ते १५ आयु पर्यंत संस्कृत, सनातन धर्म, हिंदी साहित्य, वैदिक तत्त्वज्ञान, व्याकरण, सहा वेदांग, ज्योतिष, इत्यादींचे महत्त्वपूर्ण शिक्षण ग्रहण केले.
  • रामबोला म्हणजेच तुलसीदास, यांचे गुरु नरसिंह दास यांनी रामबोला यांचे नाव बदलून, गोस्वामी तुलसीदास असे ठेवले.
  • स्वतःचे शिक्षण पूर्ण करून, संत तुलसीदासांनी आपल्या त्रिकूट या निवासस्थानी परत जाण्याचे ठरवले व लोकांना महाभारत कथा, राम कथा, इत्यादी. सांगून लोकांमध्ये प्रबोधनाचे कार्य सुरू केले.
Sant Tulsidas

तुलसीदास यांचे वैयक्तिक जीवन

  • संत तुलसीदास यांचा विवाह १५२६ च्या दरम्यान बौद्धमती नावाच्या मुलीशी झाला. बौद्धमतीला रत्नावली या नावाने ओळख होती. लग्नानंतर तुलसीदास जी आपल्या पत्नीसोबत राजापूर नावाच्या ठिकाणी वास्तव्यास होते. तुलसीदास व त्यांची पत्नी रत्नावली यांना तारक नावाचा मुलगा झाला. परंतु अगदी बालपणातच तारक याचे निधन झाले. आपल्या पुत्राच्या निधनानंतर आपल्या पत्नी विषयी तुळशीदासांची असलेली ओढ प्रचंड वाढली होती.
  • संत तुलसीदास कोणत्याही अवस्थेमध्ये, आपल्या पत्नीपासून वेगळे होणे पसंत करत नव्हते. एके दिवशी तुळशीदास यांच्या पत्नीची आई आजारी असताना, तुळशीदास यांची पत्नी तुलसीदास यांना न सांगता स्वतःच्या घरी आई-बाबांना भेटण्यासाठी गेली. ज्यावेळी तुलसीदासांना याबद्दल माहिती समजली, त्यावेळी तुलसीदास यांनी कुठच्याही गोष्टीचा विचार न करता, फक्त पत्नीला भेटण्यासाठी रात्री सासरच्या घरी जाण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी अतिशय कष्ट करून व अधीरपणे पत्नीला भेटण्यासाठी सासरी पोचले.
  • हे सर्व पाहून रत्नावलीला खूप वाईट वाटले, रत्नावली तुलसीदास यांना म्हणाली, हे माझे शरीर आहे, जे हाडांनी व मांस या घटकांनी बनलेले आहे. माझ्या एवढेच लक्ष जर तुम्ही प्रभू रामांच्या नामात दिलेत, तर तुम्हाला संसारिक आसक्ती सोडून अमरत्व, शाश्वत सुख, प्राप्त होईल. पत्नीचे हे वैशिष्ट्यपूर्ण बोलणं ऐकून, तुलसीदास यांचे डोळे उघडले व ते आपल्या संसारिक सुखाचा त्याग करून, रामभक्तीच्या मार्गे चालू लागले.

तुलसीदास तपस्वी झाले

संत तुलसीदास यांनी संसारिक सुखाचा त्याग करून, वैराग्य स्वीकारले व स्वतःचे घर सोडून, तीर्थक्षेत्रांना भेट देऊ लागले. तुलसीदास हे पुढे महान तपस्वी झाले.

तप करून त्यांनी प्रभू रामाला प्राप्त करण्याची, इच्छा मनात ठेवून, १४ वर्ष विविध ठिकाणी, फिरल्यानंतर शेवटी वाराणसीला जाऊन, त्यांनी एका आश्रमामध्ये राहून लोकांना धर्मशास्त्र इत्यादींची, शिकवण देण्यास सुरुवात केली.

Sant Tulsidas

तुलसीदासजींची प्रसिद्ध कामे

निर्मितीप्रकाशित वर्ष
वैराग्यसंदीपनी१६१२ इ.स
बारवाई रामायण१६१२ इ.स
रामचरितमानस१५७४ इ.स
कवितावाली१६१२ इ.स
श्री कृष्ण गीतावली१५७१ इ.स
रामललानहच्छू१५८२ इ.स
पार्वती-मंगल१५८२ इ.स
जानकी-मंगल१५८२ इ.स
विनय पत्रिका१५८२ इ.स

संत तुलसीदास यांना वैराग्य कसे प्राप्त झाले ?

  • श्रीरामायण या ग्रंथाचे रचैता, महर्षी वाल्मिकी यांचा कलियुगातील अवतार म्हणजे तुळशीदास, असा भक्ती विजय ग्रंथामध्ये उल्लेख आहे. हस्तिनापुरातील आत्माराम नावाच्या एका कनोजी ब्राह्मणाच्या कुळात तुळशीदास यांचा जन्म झाला. त्यांनी त्याच्या मुलाचं नाव ठेवलं, तुळशीदास. मुंजीनंतर छोट्या तुळशीदासाने गुरुगृही राहून वेधशास्त्रांचा अभ्यास केला. मातापित्यांनी एका रत्नावली नावाच्या सुशील कन्याशी, तुळशीदासाचा विवाह करून दिला. तुळशीदास आणि रत्नावली यांचे परस्परांवर विलक्षण प्रेम होते. तिच्याशिवाय तुळशीदासच जरा सुद्धा चैन पडत नसे. माहेरी गेलेल्या रात्नावलीला एका मध्यरात्री जेव्हा तुळशीदास सापाच्या दोरीवरून चढून भेटायला गेला, तेव्हा रत्नावली त्याला म्हणाली, माझ्या भेटीसाठी तुम्ही जेवढे ओढीने, तळमळीने आलात, तशीच तळमळ तशीच ओढ जर तुम्ही राम भेटीसाठी लावलात, तर तुमच्या जन्माचे सार्थक होईल. रत्नावलीचे ते शब्द तुळशिदासाच्या मनाला अंतर्बाह्य जागून गेले, तुळशीदासांनी तिला नमस्कार केला आणि सरळ रस्ता धरला, तो आनंदवनाचा. या आनंदवनात त्यांनी बारा वर्षे राम भेटीसाठी कठोर तपश्चर्या केली.
संत तुलसीदास
  • संत गोस्वामी तुलसीदास यांचा जन्म दि. १८  सप्टेंबर १६३२ राजापूर उत्तर प्रदेश येथे झाला. वयाच्या सातव्या वर्षी मातृ-पितृयोग झालेल्या, तुलसीदास यांचा सांभाळ रामभक्त असणारे नरहरी दास यांनी करून, त्यांना संस्कार आणि शिक्षणाचे धडे दिले. त्यांच्या पत्नीचे नाव रत्नावली. एके दिवशी माहेरी गेलेल्या पत्नीचा विरह सहन न झाल्याने, तिला भेटण्यासाठी तुलसीदास रात्री नदी पार करून गेले, तेव्हा पत्नी रत्नावली म्हणाली जेवढ प्रेम तुम्ही माझ्यावर करता त्याच्या निम्मी प्रेम, जर प्रभू श्रीरामावर केले, तर तुमच्या जीवनाचा उद्धार होईल. पत्नीच्या या वाक्याने, त्यांना वैराग्य प्राप्त झाले आणि गोस्वामी तुलसीदास श्री क्षेत्र काशी येथे श्रीराम कथा सांगून, समाज प्रबोधन करू लागले.
  • त्यांनी नित्य पाजलेल्या पाण्याने ब्रह्मराक्षस त्यांच्यावर प्रसन्न झाला, तुळशीदासांना म्हणाले बोल तुला काय हवे तुळशीदास म्हणाले, मला श्रीराम भेटवयाचे आहे. ब्रह्मराक्षस म्हणाला मी तुला राम भेटू शकत नाही, पण तुला राम भेटू शकणाऱ्या मारुतीच्या बद्दल सांगू शकतो, तू त्यांना शोध व रामास भेटण्यासाठी ते तुझी नक्की मदत करतील असे ब्रह्मराक्षस म्हणाला व अदृश झाला.
  • पुढे राम कीर्तनाच्या जागी तुळशीदासांना मारुतीची भेट झाली. मारुतीने तुळशीदास हा वाल्मिकी अवतार हे ओळखले. मारुतीने तुळशीदास व श्रीराम यांची भेट घडवली. रामनामाचा जप, राममूर्तीचे ध्यान आणि राम कीर्तीचे गुणगान करीत, त्यांनी लोकमानसात भक्ती रुजवली. एका श्रीराम या नामशक्तीच्या बळावर अनेक दुःखी कष्टी, जिवाचा ताप हरण केला. अनेकांना व्याधीमुक्त केले, प्रेत उठवले, दगडी नंदीला नैवेद्य खायला भाग पडले,
  • तुळशीदासांनी रामचरित्रमानस हा ग्रंथ लिहिला. अनेक सुंदर सुंदर पद रचना केल्या. राम गुणगाण करून लोकांना भक्ती मार्गाला लावले. रामभक्तीचा घरोघरी गावोगावी जाऊन, प्रचार आणि प्रसार केला. श्रीराम लक्ष्मण हे दोघं स्वतः दारावर पहारा करून, तुळशीदासांचे रक्षण करीत, अशी ही कथा भक्ती विजयात वाचायला मिळते. प्रियदास नावाच्या एका साधने संस्कृत मध्ये अनेक भक्तांची चरित्रे वर्णन करणारा एक ग्रंथ लिहिला. पण त्या ग्रंथात तुळशीदास यांचे चरित्र मात्र नव्हते असं सांगतात की, प्रत्यक्ष श्रीराम यांनी ते चरित्र लिहून, त्या ग्रंथामध्ये ठेवले. यावरूनच त्यांची श्रेष्ठता आणि योग्यता सिद्ध होते.
  • चित्रकूट येथे भगवान श्रीरामाचे दर्शन तुलसीदास यांना घडले. संत तुलसीदास यांनी अयोध्ये श्री तुलसीदास, श्री राम चरित्र मानस, हा श्री राम भक्तीवर आधारित अनमोल ग्रंथ लिहिला. संत तुलसीदास यांनी आपल्या लघु काव्यातून, लोक शिक्षणाची चालती बोलती पाठशाळा चालवली. तुलसीदास म्हणतात, “ तुलसी साठी विपत्ती के विद्या विनय विवेक साहस्य कृती सु सत्यवृत्त रामभरोसे. म्हणजे संत तुलसीदास म्हणतात, बिकट संकटाच्या वेळी व्यक्तीला त्याच्याजवळ असलेले सात गुण वाचवतील ज्ञान, विनम्रता, कुशाग्र बुद्धी, साहस, व्यक्तीची चांगली कर्म, सत्य आणि ईश्वरावर भक्ती, श्रद्धा, निरपेक्ष भाव, समर्पण.

तुलसीदासजींची हनुमानजींची भेट

  • गोस्वामी तुलसीदासांच्या अनंत कार्यांमध्ये हनुमानजींच्या भेटीचे वर्णन केले गेले आहे. तुलसीदास त्यांच्या ग्रंथांमध्ये लिहितात की, ज्यावेळी ते वैराग्य घेऊन वाराणसी मध्ये वास्तव्य करत होते, तुलसीदास यांचा करुणामयी स्वभाव पाहून, ब्रह्मराक्षस तुलसीदास यांना वरदान देण्यासाठी प्रकट होतो.
  • ब्रह्मराक्षस तुलसीदासजींना विचारतो की, तुम्हाला मी काय वरदान देऊ ज्याने तुम्ही प्रसन्न व्हाल ?  तुलसीदास म्हणतो, मला तुमच्याकडून काही वरदान नको. माझी फक्त एकच इच्छा आहे की, मला प्रभू राम यांना भेटायचे आहे. त्यावर ब्रह्मराक्षस तुलसीदास यांना म्हणतो की, मी प्रभू राम यांना तुम्हाला भेटू शकत नाही. तेवढी माझ्यामध्ये क्षमता नाही, परंतु मी तुम्हाला अशा एका व्यक्तीबद्दल सांगू शकतो, जो तुम्हाला प्रभू राम यांच्याशी तुमची भेट घडवून आणू शकेल आणि ती व्यक्ती म्हणजे संकट मोचन हनुमान. तुलसीदासजींना आश्चर्य वाटते. ते त्या ब्रह्मराक्षसास विचारतात, मला प्रभू संकट मोचन हनुमान कुठे भेटतील ? ते मला भेटणं अशक्य आहे.
  • त्यावर ब्रह्मराक्षस तुलसीदास यांना म्हणतो की, ज्या ठिकाणी तू राम कथा याचे अध्ययन करतोस, राम पाठ करतो, त्या ठिकाणी हनुमान जी हे अध्ययन ऐकण्यासाठी, कथा ऐकण्यासाठी, येतात. तू त्यांना नक्कीच भेटला असशील, त्यावर तुलसीदास यांना ब्रह्मराक्षसाचे बोलणे पटते.
  • संत तुलसीदास एकदा अध्ययन करते वेळी त्यांना हनुमंत जी अध्ययन ऐकण्यासाठी आल्याची अनुभूती होते. त्यानंतर तुलसीदास हनुमंत यांना भेटून, त्यांना विनवणी करतात की, तुम्ही मला प्रभू रामाची भेट घडवून द्या. मी त्यांचा परमभक्त आहेत. त्यावर हनुमानजी तुलसीदास यांना योग्य मार्गदर्शन करतात व त्यांना सांगतात की, तुम्ही कोणत्या गोष्टी केल्यास, तुम्हाला भगवान राम यांचे दर्शन होऊ शकेल, यावर तुलसीदास खूप आनंदीत होतात व संकट मोचन हनुमान लुप्त होतात.

तुलसीदासजींची प्रभू रामाची भेट

  • रामचरितमानसमध्ये, तुलसीदासजींची प्रभू रामाची भेट झाल्याची, ही एक प्रसिद्ध घटना, त्याचा उल्लेख केला गेला आहे. ती घटना अशी होती की, रामाचा परमभक्तीमध्ये मग्न असणारे तुलसीदास एकदा उत्तर प्रदेश मधील बुदेलखंड भागात, असणाऱ्या त्रिकूटचा रामघाट या ठिकाणी आश्रमामध्ये वास्तव्यास होते. एके दिवशी तुळशीदास कामदगिरी पर्वताची प्रदक्षिणा करण्यासाठी गेले असताना, दोन राजकुमारांना तुलसीदासांनी घोड्यावरून येताना पाहिले. परंतु तुलसीदासजीने त्या दोन राजकुमारांना ओळखले नाही व त्यांच्यातील फरकही त्यांना कळला नाही.
  • या घटनेनंतर, दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळी संत तुलसीदास नदीच्या काठावर चंदन उजळत होते, तेव्हा दोन राजपुत्र संन्याशाच्या वेषात तुलसीदासजींच्या आश्रमामध्ये आले, त्या दोन राजकुमारांना पाहून तुलसीदाजी त्यांना भगवान राम आणि त्यांचा भाऊ लक्ष्मण म्हणून पाहू लागतात. गोस्वामी तुलसीदास त्यांना म्हणतात, भगवान मी तुम्हाला ओळखल. तुमचे माझ्या आश्रमामध्ये मनापासून स्वागत आहे, प्रभू राम यांनी तुलसीदासांना चंदनाचा टिळा लावला. अश्या रीतीने महान गोस्वामी तुलसीदास यांना प्रभू राम यांची भेट होते.

तुलसीदास यांच्या निर्मितीची थोडक्यात माहिती

गीतावली

संत तुलसीदासजी यांच्या निर्मितीमधील, गीतावली या रचनेत रामायणामधील प्रसिद्ध घटना, भरत व राम यांची भेट, गीताच्या रूपामध्ये वर्णन केली गेली आहे. हे काव्य रामचरितमानसचा एक भाग आहे. या गीतावली मध्ये तुम्हाला रामायणामधील उत्तरकांड कथेची झलक नक्कीच पाहायला मिळते.

जानकी मंगल

तुलसीदासजींनी लिहिलेली जानकी मंगल ही विद्वानांची प्रसिद्ध रचना म्हणून संबोधली जाते. या जानकी मंगल रचनेमध्ये गोस्वामी तुलसीदासजींनी, माता जानकी बद्दल म्हणजेच मां सीते बद्दल वर्णन केले गेले आहे.

दोहावली

तुलसीदासजींनी दोहावली या काव्यरचनेमध्ये, प्रभू रामांच्या चरित्राचे मनोहर असे वर्णन केले आहे. या वर्णनासोबतच, तुलसीदासजींनी या दोहावली मधून प्रभुरामांचा मनमोहक व शांत स्वभाव सुद्धा चित्रित केला आहे.

तुलसीदासजींचा मृत्यू

काही ज्ञातांच्या मते, संत तुलसीदासजी त्यांच्या शेवटच्या क्षणी वाराणसी मध्ये वास्तव्य करत होते. वाराणसी या ठिकाणी वयाच्या ११२ व्या वर्षी म्हणजेच १६२३ मध्ये तुलसीदासजींनी समाधी घेतली व स्वतःचा देह त्यागला.

तुलसीदास यांच्या कविता

हनुमान चालीसा

जय हनुमान ज्ञान गुन सागर
जय कपीस तिहुँ लोक उजागर॥१॥
राम दूत अतुलित बल धामा
अंजनि पुत्र पवनसुत नामा॥२॥
महावीर विक्रम बजरंगी
कुमति निवार सुमति के संगी॥३॥


कंचन बरन बिराज सुबेसा
कानन कुंडल कुँचित केसा॥४॥
हाथ बज्र औ ध्वजा बिराजे
काँधे मूँज जनेऊ साजे॥५॥
शंकर सुवन केसरी नंदन
तेज प्रताप महा जगवंदन॥६॥
विद्यावान गुनी अति चातुर
राम काज करिबे को आतुर॥७॥


प्रभु चरित्र सुनिबे को रसिया
राम लखन सीता मन बसिया॥८॥
सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा
बिकट रूप धरि लंक जरावा॥९॥
भीम रूप धरि असुर सँहारे
रामचंद्र के काज सँवारे॥१०॥
लाय संजीवन लखन जियाए
श्रीरघुबीर हरषि उर लाए॥११॥
रघुपति कीन्ही बहुत बड़ाई
तुम मम प्रिय भरतहि सम भाई॥१२॥


सहस बदन तुम्हरो जस गावै
अस कहि श्रीपति कंठ लगावै॥१३॥
सनकादिक ब्रह्मादि मुनीसा
नारद सारद सहित अहीसा॥१४॥
जम कुबेर दिगपाल जहाँ ते
कवि कोबिद कहि सके कहाँ ते॥१५॥
तुम उपकार सुग्रीवहिं कीन्हा
राम मिलाय राज पद दीन्हा॥१६॥
तुम्हरो मंत्र बिभीषण माना
लंकेश्वर भये सब जग जाना॥१७॥


जुग सहस्त्र जोजन पर भानू
लिल्यो ताहि मधुर फ़ल जानू॥१८॥
प्रभु मुद्रिका मेलि मुख माहीं
जलधि लाँघि गए अचरज नाहीं॥१९॥
दुर्गम काज जगत के जेते
सुगम अनुग्रह तुम्हरे तेते॥२०॥
राम दुआरे तुम रखवारे
होत ना आज्ञा बिनु पैसारे॥२१॥
सब सुख लहैं तुम्हारी सरना
तुम रक्षक काहु को डरना॥२२॥


आपन तेज सम्हारो आपै
तीनों लोक हाँक तै कापै॥२३॥
भूत पिशाच निकट नहिं आवै
महावीर जब नाम सुनावै॥२४॥
नासै रोग हरे सब पीरा
जपत निरंतर हनुमत बीरा॥२५॥
संकट तै हनुमान छुडावै
मन क्रम बचन ध्यान जो लावै॥२६॥
सब पर राम तपस्वी राजा
तिन के काज सकल तुम साजा॥२७॥
और मनोरथ जो कोई लावै
सोई अमित जीवन फल पावै॥२८॥
चारों जुग परताप तुम्हारा
है परसिद्ध जगत उजियारा॥२९॥


साधु संत के तुम रखवारे
असुर निकंदन राम दुलारे॥३०॥
अष्ट सिद्धि नौ निधि के दाता
अस बर दीन जानकी माता॥३१॥
है। राम रसायन तुम्हरे पासा
सदा रहो रघुपति के दासा॥३२॥
तुम्हरे भजन राम को पावै
जनम जनम के दुख बिसरावै॥३३॥


अंतकाल रघुवरपुर जाई
जहाँ जन्म हरिभक्त कहाई॥३४॥
और देवता चित्त ना धरई
हनुमत सेई सर्व सुख करई॥३५॥
संकट कटै मिटै सब पीरा
जो सुमिरै हनुमत बलबीरा॥३६॥
जै जै जै हनुमान गोसाई
कृपा करहु गुरु देव की नाई॥३७॥


जो सत बार पाठ कर कोई।
छूटहिं बंदि महा सुख होई॥३८॥
जो यह पढ़ै हनुमान चालीसा।
होय सिद्धि साखी गौरीसा॥३९॥
तुलसीदास सदा हरि चेरा।
कीजै नाथ हृदय मह डेरा॥४०॥

तुलसी स्तवन

तुलसी ने मानस लिखा था जब जाति-पाँति-सम्प्रदाय-ताप से धरम-धरा झुलसी।
झुलसी धरा के तृण-संकुल पे मानस की पावसी-फुहार से हरीतिमा-सी हुलसी।।
हुलसी हिये में हरि-नाम की कथा अनन्त सन्त के समागम से फूली-फली कुल-सी।
कुल-सी लसी जो प्रीति राम के चरित्र में तो राम-रस जग को चखाय गये तुलसी।।


आत्मा थी राम की पिता में सो प्रताप-पुन्ज आप रूप गर्भ में समाय गये तुलसी।
जन्मते ही राम-नाम मुख से उचारि निज नाम रामबोला रखवाय गये तुलसी।।
रत्नावली-सी अर्द्धांगिनी सों सीख पाय राम सों प्रगाढ प्रीति पाय गये तुलसी।
मानस में राम के चरित्र की कथा सुनाय राम-रस जग को चखाय गये तुलसी।।

केशव, कहि न जाइ का कहिये।

केशव, कहि न जाइ का कहिये।
देखत तव रचना विचित्र अति, समुझि मनहिमन रहिये।
शून्य भीति पर चित्र, रंग नहि तनु बिनु लिखा चितेरे।
धोये मिटे न मरै भीति, दुख पाइय इति तनु हेरे।


रविकर नीर बसै अति दारुन, मकर रुप तेहि माहीं।
बदन हीन सो ग्रसै चराचर, पान करन जे जाहीं।
कोउ कह सत्य, झूठ कहे कोउ जुगल प्रबल कोउ मानै।
तुलसीदास परिहरै तीनि भ्रम, सो आपुन पहिचानै

तुलसीदासजींचे दोहे

१. नामु राम को कलपतरु कलि कल्यान निवासु |
जो सिमरत भयो भाँग ते तुलसी तुलसीदास ||

अर्थ – रामाचे नाव कल्पतरू आणि कल्याणाचे निवासस्थान आहे ज्याचे स्मरण केल्याने तुळशीदास ही तुळशी सारखे पवित्र झाले.

२. सुर समर करनी करहिं कहि न जनावहिं आपु |
बिद्यमान रन पाइ रिपु कायर कथहिं प्रतापु ||

अर्थ – शूर-पुरुष युद्धात शौर्याचे कृत्य करतात आणि असे बोलून स्वतःला ओळखत नाही, युद्धात शत्रू आढळून आल्यावर फक्त भ्याड लोकच आपल्या महानतेचा अभिमान बाळगतात.

३. तुलसी भीतर बाहेरहुँ जौं चाहसि उजिआर ||
राम नाम मनिदीप धरु जीह देहरीं द्वार |

अर्थ – तुलसीदास म्हणतात की हे मनुष्य जर तुला आतून आणि बाहेरून शांती हवी असेल तर तोंडा सारख्या दाराच्या उंबरठ्यावर राम नावाचा जप कर.

४. तुलसी देखि सुबेषु भूलहिं मूढ़ न चतुर नर |
सुंदर केकिहि पेखु बचन सुधा सम असन अहि ||

अर्थ – गोस्वामी ची म्हणतात की सुंदर वेश पाहून केवळ मूर्खच नाही तर हुशारही लोक फसतात जरा सुंदर मोर बघा त्याचे शब्द अमृता सारखे आहेत पण त्याचे अन्न सापासारखे आहे.

५. सहज सुहृद  गुर स्वामि सिख जो न करइ सिर मानि |
सो  पछिताइ  अघाइ उर अवसि होइ हित हानि ||

अर्थ – जो गुरु आणि स्वामींच्या उद्देशाचे मनापासून पालन करत नाही ज्याला नैसर्गिक रित्या कल्याणाची आवड असते त्याला अंतकरणात खूप पश्चाताप होतो आणि त्याचे कल्याण निश्चितच होते.

FAQ

१. तुलसीदास राम भेटला का?

तुलसीदास नदीच्या काठावर चंदन उजळत होते, तेव्हा दोन राजपुत्र संन्याशाच्या वेषात तुलसीदासजींच्या आश्रमामध्ये आले, त्या दोन राजकुमारांना पाहून तुलसीदाजी त्यांना भगवान राम आणि त्यांचा भाऊ लक्ष्मण म्हणून पाहू लागतात. गोस्वामी तुलसीदास त्यांना म्हणतात, भगवान मी तुम्हाला ओळखल. तुमचे माझ्या आश्रमामध्ये मनापासून स्वागत आहे, प्रभू राम यांनी तुलसीदासांना चंदनाचा टिळा लावला. अश्या रीतीने महान गोस्वामी तुलसीदास यांना प्रभू राम यांची भेट होते.

२. तुलसीदास हनुमानाला कसे भेटले?

तुलसीदास एकदा अध्ययन करते वेळी त्यांना हनुमंत जी अध्ययन ऐकण्यासाठी आल्याची अनुभूती होते. त्यानंतर तुलसीदास हनुमंत यांना भेटून, त्यांना विनवणी करतात की, तुम्ही मला प्रभू रामाची भेट घडवून द्या.

३. तुलसीदास यांचा जन्म कधी झाला ?

संत तुलसीदास म्हणजेच गोस्वामी तुलसीदास. यांचा जन्म उत्तर प्रदेशामधील, कासगंज या ठिकाणी सरयुपरिया या ब्राह्मण कुटुंबामध्ये, १५११ साली झाला.

४. तुलसीदास यांचा मृत्यू कधी झाला ?

तुलसीदासजी त्यांच्या शेवटच्या क्षणी वाराणसी मध्ये वास्तव्य करत होते. वाराणसी या ठिकाणी वयाच्या ११२ व्या वर्षी म्हणजेच १६२३ मध्ये तुलसीदासजींनी समाधी घेतली व स्वतःचा देह त्यागला.

निष्कर्ष

मित्रहो आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास संत तुलसीदास यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment